‘प्रचाराला मुले भाड्याने मिळतील’, सांगलीतील अजब जाहिरात

टीम महाराष्ट्र देशा : सांगलीत महापालिकेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरवात झाली आहे. प्रचारात विविध रंग भरण्यासाठी सगळे पक्ष जोमाने तयारीला लागले असून एकमेकांच्या वरचढ ठरण्यासाठी वेगवेगळ्या शक्कल लावल्या जात आहेत.

Loading...

सांगलीत हरिपूर रोडवरील पाटणे प्लॉट येथील एक बोर्ड सगळ्याचं लक्ष वेधून घेतो आहे. या बोर्डवर जे लिहिलं आहे ते बघून तुम्हाला देखील धक्का बसेल. बोर्डच्या आशयावर ‘आत्ताच सावकार व्हा’ असं लिहिलं आहे. तसेच ‘प्रचाराला मुले भाड्याने मिळतील’. असे या बोर्डवर लिहिण्यात आले आहे याशिवाय संपर्कासाठी मोबाईल क्रमांक नमूद करण्यात आला आहे. प्रचार हा कार्यकर्त्यांशिवाय पूर्ण होऊच शकत नाही.पाठीशी कार्यकर्ते असल्यावर प्रचार करताना वजन पडतं. म्हणून याकाळात आमिष दाखवून लोकांना आकर्षित केले जाते.

सांगलीत सध्या हा बोर्ड सगळ्यांच्या चर्चेचा विषय बनला आहे.सोशल मिडीयावर ह्या बातमीने चांगलाच जोर धरला आहे. निवडणुका आल्या की अनेक चर्चांना उधान येतं, कार्यकर्त्यांसाठी चहापानाचा कार्यक्रम असो किंवा अन्यकाही मागण्या असो, कार्यकर्त्यांना चांगलीच मागणी आहे असं म्हणायला काही हरकत नाही.

केवळ मोदींच्या भाषणाने लोकांची पोटं भरणार नाहीत – सोनिया गांधी

मोदी सरकार घालवा, साहित्यिक, विचारवंतांचा एल्गार

जलसंपदा मंत्री गिरीश महाजनांनी वाहतुकीचे नियम पायदळी तुडवलेLoading…


Loading…

Loading...