fbpx

मालेगाव बॉम्बस्फोट : खोटी कलमे लावणा-या पोलीस, राज्यकर्त्यांवर कठोर कारवाई करा-पुनाळेकर

sanjeev_punalekar

मुंबई : मालेगाव प्रकरणी आरोपींवर खोटी कलमे लावणा-या पोलीस आणि तत्कालीन राज्यकर्त्यांची चौकशी होऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी या प्रकरणातील ५ आरोपींचे वकील तथा हिंदू विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांनी केली आहे.

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी एनआयएच्या विशेष न्यायालयात आज आरोप निश्चिती करण्यात आली. त्यामध्ये साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह अन्य सहका-यांवर आरोप निश्चिती झाली; मात्र या प्रकरणी मोक्का कायद्यातून सर्वांचीच मुक्तता करण्यात आली. हा खऱ्या अर्थाने आम्हाला आनंद होत आहे. परंतु आजवर मोक्का कायदा लावल्यामुळे आणि अन्य कायद्यांखाली काही जणांवर आरोप निश्चिती झाल्यामुळे अद्याप संपूर्ण न्याय मिळाला नसल्याची खंतही श्री. पुनाळेकर यांनी व्यक्त केली.