डॉ. दाभोळकर खून प्रकरणी ॲड. पुनाळेकर यांना जामीन

टीम महाराष्ट्र देशा : डॉ. नरेंद्र दाभोळकर खून प्रकरणी ताब्यात असलेल्या संजीव पुनाळेकर यांना अटी शर्तींवर जामीन मिळाला आहे. ३० हजारांच्या वैयक्तिक जात मुचलक्यावर विशेष न्यायाधीश आर. एम. पांडे यांनी हा जमीन मंजूर केला आहे.

डॉ. नरेंद्र दाभोळकर खून प्रकरणात आरोपींना शस्त्र नष्ट करण्याचा सल्ला दिल्याप्रकरणी सीबीआयने ॲड. संजीव पुनाळेकर यांना अटक केली होती. पुनाळेकर यांनी जामिनासाठी याचिका दाखल केली होती. दरम्यान त्यांना जमीन मिळाला असून, ३० हजारांच्या वैयक्तिक जात मुचलक्यावर विशेष न्यायाधीश आर. एम. पांडे यांनी हा जमीन मंजूर केला आहे.

इतकेच नव्हे तर न्यायालयाच्या परवानगी शिवाय भारत सोडून न जाणे, तसेच पाहिले तीन महिने सोमवार आणि गुरुवार सीबीआयच्या मुंबई येथील कार्यालयात उपस्थित राहणे याचबरोबर पुराव्यांशी छेडछाड करू नये अशी अट घालूनच त्यांना जमीन मंजूर केला आहे.Loading…
Loading...