संभाजीराजे मराठा युवकांचे पुढारी असतील पण ते मंत्र्यांपेक्षा मोठे नाहीत – गुणरत्न सदावर्ते

sadavarte - sambhaji raje

मुंबई : मराठा समाजाच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक विकासासाठी फडणवीस सरकारनं सुरू केलेल्या ‘सारथी’ संस्थेबाबतचे वाद शमता शमत नाहीत. आज या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार संभाजीराजे यांच्यासह मराठा क्रांतीचे समन्वयक व वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये बैठक आयोजित केली गेली होती.

मात्र, या बैठकीमध्ये गोंधळ झाल्याने स्वतः खासदार छत्रपती संभाजी राजे यांना मी बाहेर जाऊ का असे उद्गार काढावे लागले. सारथी व मराठा समाजातील अनेक प्रश्नांवर हि बैठक मंत्रालयात आयोजित केली गेली होती. या बैठकीत छत्रपती संभाजीराजे यांना मंचावर न बसवता तिसऱ्या रांगेत बसवल्याने मराठा समन्वयकानी नाराजी व्यक्त केल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

छत्रपती खाली बसणार असतील तर आम्ही बाहेर लोकांना काय तोंड दाखवायचं असा भावनिक प्रश्न उपस्थित करून मंचावर बसण्याची विनंती समन्वय समितीतील सदस्यांनी केली, जेणेकरून कोणताही वाद निर्माण होणार नाही. मात्र, छत्रपती संभाजीराजे यांनी अत्यंत विनम्रपणे मी एक सदस्य म्हणून या बैठकीला आलो आहे व मान-अपमासाठी आलो नसून सारथीवरील प्रश्नांवर दाद मागायला आलो आहे असे देखील सांगितले.

दरम्यान यावर अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. खासदार संभाजीराजे मराठा युवकांचे पुढारी असतील पण ते मंत्र्यांपेक्षा मोठे नाहीत त्यांनी आपल्या समर्थकांना समजावून सांगितले पाहिजे अस सदावर्ते म्हणाले आहेत.

काय म्हणाले गुणरत्न सदावर्ते ?

‘अनुसूचित जाती-जमाती सारख्या लोकांना शंभर जागा ,तर केवळ मराठl हे पॉलिटिकली शक्तिशाली आहेत म्हणून 1000 जागा पैशाची लूट आहे .सभ्यता नसणाऱ्याणा या सगळ्या गोष्टी देण्याची गरज काय? सरकारने बोलावलेल्या बैठकीत गोंधळ का तर कायद्याची त्यांना भीती नाही! अनुसूचित जाती-जमातीच्या अत्याचार थांबण्याच्या हक्कासाठी गृहमंत्र्यांच्या गाडीला थांबवण्यासाठी किंवा निषेध नोंदविण्यासाठी प्रयत्न केला तर शासकीय कामकाजात अडथळा गुन्हा दाखल होतो मात्र मराठा गोंधळ खुरांनी गोंधळ केला तेव्हा गुन्हा दाखल होत नाही तर उपमुख्यमंत्री अजित हे विनवणी करण्यासाठी पुढे जातात हा कसा बावळटपणा बेशिस्त संविधान’ शिस्त मंत्र्यांनी शपथ घेतलेली असते भारतीय संविधानाच्या शहाणपणाने वागले पाहिजे राजेशाही संपलेली आहे महाराजा कोणी नाही खासदार संभाजी मराठा युवकांचे आणि अशा टारगेटयांचे नेतृत्व करणं हे कितपत योग्य आहे याचा देखील खासदार संभाजीने विचार केला पाहिजे.

संभाजीराजे मराठा युवकांचे पुढारी असतील पण ते मंत्र्यांपेक्षा मोठे नाहीत – गुणरत्न सदावर्ते

संभाजीराजे मराठा युवकांचे पुढारी असतील पण ते मंत्र्यांपेक्षा मोठे नाहीत – गुणरत्न सदावर्ते

Posted by Maharashtra Desha महाराष्ट्र देशा on Thursday, July 9, 2020