विधानसभा निवडणुकीसाठी मराठवाड्यात प्रशासन सज्ज

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 चा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. यानंतर मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातील प्रशासन निवडणुकी प्रक्रीयेसाठी सज्ज झाले आहेत.निवडणुकीदरम्यान आचारसंहितेचे काटेकोर पालन होण्यासह कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नियुक्त सर्व यंत्रणांनी दक्षपणे काम करावे; तसेच समन्वय राखून निवडणुका निर्भय व निष्पक्षपणे पार पाडाव्यात, असे निर्देश देण्यात आले असल्याचे आठही जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगितले.

आचार संहिता लागू होताच 644 जणांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. यासह मागील निवडणुकांमध्ये शांतता भंग करणाऱ्यांवर गुन्हे दखल आहेत. ते निकाली काढण्यात येणार आहे. अशी माहिती पोलिस आयुक्त मीना मकवाना यांनी दिली. आचारसंहिता लागू झाल्यानंतर जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी पत्रकार परिषद घेतली.त्यात मकवाना बोलत होते.

मराठवाड्यात एकुण मतदान केंद्र 3024 आहेत. त्यात पुरुष मतदार 15 लाख 3 हजार 60 तर महिला 13 लाख 46 हजार 669 मतदार आहेत. एकुण 28 लाख 49 हजार 755 मतदार आहेत. निवडणुक प्रक्रियेसाठी 16000 अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

जालन्यात यंत्रणा सज्ज

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक जिल्ह्यात प्रशासन यंत्रणा सज्ज झाला आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नियुक्त सर्व यंत्रणांनी दक्षपणे काम करावे; तसेच समन्वय राखून निवडणुका निर्भय व निष्पक्षपणे पार पाडाव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी दिले आहेत.

प्रचारासाठी प्लॅस्टिकचा वापर करू नका – निवडणूक आयोग
लातूर : निवडणूक प्रचारासाठी राजकीय पक्ष व उमेदवारांनी प्लॅस्टिक साहित्याचा वापर करू नये, असा सल्ला आयोगाने दिला आहे. हा सल्ला पक्ष व उमेदवारांनी मानावा असे आवाहन करण्यात येत आहे.

उस्मानाबाद:

239 औसा विधानसभा मतदाससंघात
एकूण मतदान केंद्रे 304
पुरुष मतदार 1 लाख 50 हजार 666
महिला मतदार 1 लाख 32 हजार 632
एकुण मतदार -2 लाख 83 हजार 298

निलंगा (लातूर)

मतदान केंद्र
पुरुष मतदार 1 लाख 66 हजार 875
महिला मतदार- 1 लाख 49 हजार 322
एकुण मतदार 3 लाख 16 हजार 198

उदगीर मतदारसंघ

मतदारसंघात 321 केंद्र
पुरुष मतदार 1 लाख 58 हजार 257
महिला मतदार 1 लाख 40 हजार 154
एकुण मतदार 2 लाख 99 हजार 109

बीड
2321 मतदान केंद्रे
एकुण मतदार20 लाख 59 हजार 639 मतदार

महत्वाच्या बातम्या