fbpx

आदिवासी साहित्य पुरस्काराला स्थगिती दिल्याने साहित्यिक नाराज

टीम महारष्ट्र देशा : आदिवासी साहित्य वाचकांसमोर यावे तसेच नवीन लेखकांना उत्तेजन मिळावे यासाठी यशवंतराव चव्हाण राज्य वाड.मय योजनेअंतर्गत आदिवासी साहित्य पुरस्काराचा समावेश करण्यात आला होता. मात्र राज्य शासनाकडून दिलेल्या अध्यादेशात सुधारणा करण्यात येणार असल्याने शासनाकडून या पुरस्काराला तूर्तास तरी स्थगिती देण्यात आली आहे. या स्थगितीमुळे अनेक आदिवासी साहित्यिक नाराज आहेत.

यशंवतराव चव्हाण राज्य वाड.मय पुरस्कार योजना साहित्य संस्कृती मंडळाकडून आज पर्यंत आदिवासी साहित्याचा वेगळा समावेश करण्यात आला नव्हता. आदिवासी साहित्याचे वेगळेपण वाचकांसमोर यावे तसेच आदिवासी साहित्य हे इतर साहित्य विश्वापेक्षा वेगळ आहे हे वाचकांना व साहित्यप्रेमींना दाखवून द्यावे यासाठी आदिवासी साहित्य पुरस्काराचा समावेश करण्यात आला होता. तसेच राज्य शासनाकडून २३ ऑगस्ट २०१७ रोजी याबाबतचा अध्यादेश देखील काढण्यात आला होता.

२३ ऑगस्ट २०१७ रोजी काढण्यात आलेल्या अध्यादेशानुसार यावर्षी हा पुरस्कार जाहीर करणे अपेक्षित होते. पण तस झाले नाही.आदिवासी साहित्याला वेगळे स्थान मिळावे यासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे लळित रंगभूमीचे अध्यक्ष डॉ. कुंडलिक केदारी यांनी माहिती अधिकारा खाली चौकशी केली असता अध्यादेशात सुधारणा करण्यात येणार असल्याने तूर्तास तरी शासनाकडून देण्यात आलेल्या अध्यादेशाला स्थगिती दिली आहे.तसेच शासन निर्णयामध्ये दुरुस्ती झाल्यानंतर नवीन अध्यादेश जारी करण्यात येणार असल्याच उत्तर शासनाकडून मिळाल आहे.

या साऱ्या प्रकारामुळे आदिवासी साहित्यिक फार नाराज झाले असून इतर देखील सामाजिक स्तरावरून या स्थगिती बाबत नाराजी व्यक्त होत आहे.

1 Comment

Click here to post a comment