Share

Dasara Melava । उद्धव ठाकरे आजारी असताना आदित्य स्वित्झर्लंडमध्ये मजा करत होते; शिंदे गटाचा दावा

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात बुधवारचा दसरा मेळाव्याचा दिवस अनेक अर्थांनी महत्त्वाचा मानला जातोय. शिवसेनेत फूट पडल्यानंतर मुंबईत उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून दोन दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं होत. दोन्ही मेळावे पार पडले. यानंतर काल दिवसभर देखील याच मेळाव्यांची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्यातील आरोप प्रत्यारोप दसरा मेळाव्यात शिंगेला पोहोचले होते. उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यातून शिंदे गटावर कडाडून टीका केली

यावेळी दसरा मेळाव्यात खासदार राहुल शेवाळे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. ज्यावेळी उद्धव ठाकरे आजारी होते आणि आम्ही गद्दारी केली असं वारंवार युवराज बोलत आहेत. त्यावेळी स्वत: युवराज स्वित्झर्लंडमध्ये होते. उद्योगमंत्र्यांची परिषद होती पण पर्यावरण मंत्री स्वत:च तिथं गेले. ज्यावेळी उद्धव ठाकरे यांच्यावर ऑपरेशन सुरू होतं त्यावेळी हेच युवराज स्वित्झर्लंडमधील पबमध्ये मजा मारत होते याची सर्व माहिती आज सादर करणार आहे, असा खळबळजनक गौप्यस्फोट राहुल शेवाळे यांनी यावेळी केला.

दरम्यान, शिवाजी पार्कमधील दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे म्हणाले होते, मला वाईट वाटतं आजारपणामुळे मी रुग्णालयात दाखल असताना ज्यांच्याकडे मी राज्याची जबाबदारी दिली ते कटप्पा निघाले. त्यांनीच माझा विश्वासघात केला. मी रुग्णालयातून परत येणार नाही, असा विचार त्यांनी केला होता, असंही उद्धव म्हणाले. उद्धव यांच्या कटप्पा टीकेला शिंदे यांनी प्रत्युत्तर देत कटप्पा स्वाभिमानी होता, असं म्हटलं.

महत्वाच्या बातम्या 

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात बुधवारचा दसरा मेळाव्याचा दिवस अनेक अर्थांनी महत्त्वाचा मानला जातोय. शिवसेनेत फूट पडल्यानंतर मुंबईत उद्धव ठाकरे आणि …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Politics

Join WhatsApp

Join Now