आदित्य ठाकरेंच्या कार्यक्रमातील मंडप वाऱ्याने उडाला

टीम महाराष्ट्र देशा– आदित्य ठाकरे दोन दिवसाच्या कोल्हापूर दौऱ्यावर असून आज येथील एका शाळेत विद्यार्थ्यांना स्वसंरक्षणाचे धडे देण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला आदित्य प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी दोन हजार विद्यार्थीनी आणि ५०० विद्यार्थी उपस्थित होते. या विद्यार्थ्यांना बसण्यासाठी मोठा मंडप उभारण्यात आला होता. कार्यक्रम सुरू असताना अचानक हवेचा दाब वाढला आणि संपूर्ण मंडप उडाला. मात्र काही क्षणातच मंडप पुन्हा आहे तसाच जागेवर आला.

यावेळी मंडपाबरोबर मंडपचे चारही खांब उलटले होते. अचानक झालेल्या या प्रकारामुळे एकच गोंधळ निर्माण झाला. विद्यार्थींनीही आरडाओरड सुरू केली. यावेळी सेनेच्या कार्यकर्त्यांनी तसेच उपस्थितांनी प्रसंगावधान राखत वेळीच परिस्थिती हाताळली.

दरम्यान, त्यानंतर आदित्य ठाकरे यांनीही मीच जादूने हा मंडप वर नेऊन खाली आणल्याचं सांगत प्रसंगावधान दखवत झाल्या प्रकारावर पडदा टाकला. मात्र ठाकरे यांनी काढलेल्या या विनोदामुळे एकच हशा पिकला आणि वातावरण पुन्हा पाहिल्यासारखं झालं.

You might also like
Comments
Loading...