आदित्य ठाकरे उतरणार विधानसभा निवडणूकीच्या रिंगणात ?

आदित्य ठाकरे

टीम महारष्ट्र देशा : देशातील लोकसभा निवडणुका पार पडल्या असून पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या ३० तारखेला पुन्हा एकदा पंतप्रधान पदाची शपथ घेऊन स्थिर सरकारची वाटचाल तशीच पुढे चालू ठेवणार आहेत. आता राज्यात देखील आगामी विधानसभा निवडणुकींचे वारे वाहू लागले आहेत. तर दुसरीकडे विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे युवसेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी निवडणूक लढवावी अशी मागणी युवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून आणि पदाधिकार्यांनी केली आहे.

शिवसेना युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई आणि युवा सेनेचे कार्यकर्ते यांनी आदित्य ठाकरे यांनी आगामी लोकसभा निवडणूक लढवावी असा आग्रह धरला आहे. तर वरुण सरदेसाई यांनी इंस्टाग्रामवरुन ही मागणी केली आहे. वरुण हे आदित्य ठाकरे यांचे मावस बंधू देखील आहेत, त्यांनी इंस्टाग्रामवरून ही मागणी केली आहे. ‘हीच वेळ आहे..हीच संधी आहे.. लक्ष्य – विधानसभा २०१९ !! महाराष्ट्र वाट पाहतोय’, असा उल्लेख करत त्यांनी आदित्य ठाकरे यांचा फोटो शेअर केला आहे. या पोस्टमध्ये त्यांनी आदित्य ठाकरे यांना टॅग देखील केले आहे. जर आदित्य ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असतील तर त्यांनी वांद्रे पूर्व या विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढतील अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

दरम्यान शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठोपाठ उद्धव ठाकरे यांनी देखील निवडणुक लढवणार नसल्याचे म्हटले होते. पण आदित्य ठाकरे यांनी निवडणूक लढवावी अशी मागणी शिवसेना आणि युवासेनेचे पदाधिकारी करत आहेत. उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भात याआधीच स्पष्ट केले होते की, निवडणूक लढवायची की नाही याचा निर्णय आदित्य ठाकरे यांचाच असेल.