…पण तो गजाआड आहे… हा मनाआड !

टीम महाराष्ट्र देशा : आ. नितेश राणे यांच्या प्रशासकीय अधिकाऱ्यावरच्या चिखलफेकी प्रकरणानंतर अनेकांनी राणेंना लक्ष केले आहे. नितेश राणे यांचे वागणे हे चुकीचे असल्याच अनेक नेत्यांनी म्हंटल आहे. याप्रकरणी नितेश राणे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. याच मुद्द्यावरून आता शिवसेनेचे युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी एका फोटोतून नितेश राणेंना मार्मिक टोला लगावला आहे.

Loading...

‘चिखल इथेही आहे.. चिखल तिथेही होता…पण तो गजाआड आहे… हा मनाआड,’ असं कॅप्शन देत आदित्य ठाकरे यांचा स्वच्छता करतानाचा एक फोटो युवासेनेकडून सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला आहे. या कॅप्शनद्वारे तुरुंगात असलेल्या नितेश राणे यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे.

दरम्यान आमदार नितेश राणे आणि स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मुंबई गोवा महामार्गाचे उपअभियंते प्रकाश शेडेकर यांना गडनदी पुलावर बांधत त्यांच्या डोक्यावर चिखलाच्या बादल्या ओतल्या होत्या. एवढंच नव्हे तर सर्वसामान्य नागरिक रोज जो चिखल मारा सहन करत आहे, तो तुम्ही पण आज अनुभवावा, असं म्हणत त्यांच्या डोक्यावर चिखलाच्या बादल्या स्वभिमानीच्या कार्यकर्त्यांकडून ओतण्यात आल्या.Loading…


Loading…

Loading...