आदित्य ठाकरे यांनी मोहोळ तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागाची केली पाहाणी

टीम महाराष्ट्र देशा – युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे सोमवारपासून दुष्काळग्रस्त भागांचा दौरा करत आहेत. आज दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागाची पाहाणी त्यांनी केली. आदित्य ठाकरे पोखरापूर येथील तलावाची पाहाणी केली. याभागातील शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी देखील उपस्थित होते.

मोहोळ तालुक्यातील सारोळे गावात एखादे दुसरे जनावर असलेल्या अत्यंत गरजू शेतकऱ्यांची यादी संबंधित युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांमार्फत मागविण्यात आली. त्यांना आज सकाळी १० वाजता सारोळे गावात युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते जनावरांसाठी चारा वाटप करण्यात आला. यावेळी जिल्हाप्रमुख वानकर, दीपक गायकवाड,काका देशमुख,विठ्ठल वानकर,विक्रांत काकडे,अशोक भोसले,शहाजी भोसले,नागेश व्हनकळस,रणजित गायकवाड, मनीष काळजे,सुमित साळुंखे, बालाजी चौगुले, बापू भोसले, उपस्थित होते.