fbpx

काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे भ्रष्टवादी पक्ष असून, त्यांना थारा देऊ नका : आदित्य ठाकरे

आदित्य ठाकरे

टीम महाराष्ट्र देशा : काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे भ्रष्टवादी पक्ष असून, त्यांना थारा देऊ नका. असे जनतेला आवाहन करत शिवसेनेचे युवानेते आदित्य ठाकरे यांनी नाशिकच्या प्रचार सभेमध्ये आघाडीला चांगलेच फटकारे मारले. नाशिक मधले युतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारार्थ आले असता आदित्य ठाकरे यांनी ही टोलेबाजी केली.

यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले की, हेमंत गोडसे यांच्या विरोधात उभे असलेले राष्ट्रवादीचे उमेदवार मनीलाँडरींगमध्ये जेलची हवा खाऊन आले आहेत. भविष्यात पुन्हा ते जेलमध्ये शंभर टक्के हजेरी लावणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही कोणाला निवडून देणार, असा सवाल त्यांनी उपस्थितांना केला. तर सत्तर वर्षात गरिबी हटविता न आलेल्या काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी न्यायाची भाषा करू नये, असेही ते म्हणाले.

दरम्यान आदित्य ठाकरे यांनी भाजप बरोबर युती का केली याच स्पष्टीकरण दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सध्या तरी दुसरा कोणताही पर्याय नाही. हे विचारात घेऊन युती केली आहे असे आदित्य म्हणाले आहेत.