मुख्यमंत्र्यांआधी युवानेते आदित्य ठाकरे काढणार ‘जन आशीर्वाद’ यात्रा

टीम महाराष्ट्र देशा : शिवसेनेचे युवसेना प्रमुख आदित्य ठाकरे हे येत्या विधानसभा निवडणुकीत चांगलेच सक्रीय झाले आहेत. तर आदित्य ठाकरे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘जन आशीर्वाद यात्रा’ काढणार आहेत. या यात्रेला येत्या शुक्रवार पासून सुरुवात करणार आहेत. अंबाबाईच्या दर्शनानंतर कोल्हापूरातून या यात्रेला सुरुवात होणार आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे यांची ही जन आशीर्वाद यात्रा विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने महत्वाची ठरणार आहे.

लोकसभा निवडणुकीत भरभरुन मतदान करणाऱ्यांचे आभार मानण्यासाठी आणि मतदान न केलेल्यांची मनं जिंकण्यासाठी आदित्य ठाकरे ‘जन आशीर्वाद यात्रा’ काढणार आहेत. शिवसेना – भाजप येत्या विधानसभा निवडणुकीला युतीकरत सामोरी जात आहे. युती असली तरी शिवसेना भाजपमध्ये काही अंतर्गत मतभेद असल्याचं दिसत आहे. त्यामुळे शिवसेनेला २०१४च्या विधानसभा निवडणुकीचा अनुभव असल्याने आता कोणत्याही प्रकारचा धोका पत्करणाची शिवसेनेची मनस्थितीत नसल्याच दिसत आहे.

Loading...

दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस १ ऑगस्टपासून विकास यात्रा काढणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर वातावरण निर्मिती करुन पाच वर्षातील कामं लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांकडून केला जाणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे यांची यात्रा ही भाजप सेनेला येत्या निवडणुकीच्या दृष्टीने महत्वाची ठरणार आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

इतिहासावरून देवेंद्र फडणवीस-आदित्य ठाकरेंमध्ये जुंपली
'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'
सुप्रिया सुळे यांनीही पहिला 'तान्हाजी', चित्रपट पाहून म्हणाल्या...
पाच वर्ष सरकार चालवायचं आहे लक्षात ठेवा;शरद पवारांचा संजय राऊतांना सूचक इशारा
मलाही बेळगाव पोलिसांनी मारहण केली होती : शरद पवार
सचिन सावंत संभाजी भिडेंवर बरसले, म्हणतात...
राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेला 'हा' युवा आमदार बनला ठाणे शहर जिल्हा भाजप अध्यक्ष
'माझे पप्पा' हा निबंध लिहून सर्वांच्या डोळ्याला पाणी आणणाऱ्या 'त्या' मुलाची धनंजय मुंडेंनी घेतली दखल
वंशज असल्याचे पुरावे मागणे चुकीचेचं नाही तर मूर्खपणाचे
‘सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी विरोधी पक्षातील भूमिकेतून बाहेर यावं’