मी मुख्यमंत्री व्हावं म्हणून ही यात्रा काढली नाही – आदित्य ठाकरे

टीम महाराष्ट्र देशा : मी सुरू केलेली यात्रा शिवसेनेचे सरकार आणण्यासाठी किंवा मला मुख्यमंत्री व्हायचे म्हणून काढलेली नाही. तर परक्यांना आपलेसे करायचे आणि आपल्या लोकांचे आशीवार्द घेऊन पुढे वाटचाल करीत जनतेच्या मनातील नवा महाराष्ट्र घडविण्यासाठी ही यात्रा निघाली आहे, असे प्रतिपादन युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले. जन आशीर्वाद यात्रेअंतर्गत नाशिक येथील नर्मदा लॉन्सवर झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.

जनता जनार्दन माझा देव आहेे, त्यामुळे तीर्थयात्रेप्रमाणे जनतेचे आशीर्वाद घेण्यासाठी मी इथे आलो आहे. सत्ता मिळाल्यानंतर लोक कार्यालयांमध्ये खुर्च्या टाकून बसतात. पण शिवसेना हा एकमेव पक्ष आहे, जो सरकारमध्ये असो नसो जनतेच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरलेला असतो. त्यामुळेच महाराष्ट्रात सगळ्यांनी एकत्र येऊन शिवसेनेला साथ द्यावी, असे आवाहन ठाकरे यांनी केले.