आमचे खत चांगले आहे त्यामुळे महाराष्ट्र हिरवागार आणि भगवा होणार : आदित्य ठाकरे  

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात सध्या पक्षांतराचे वारे वाहत आहे. आघाडीतील बरेच नेते शिवसेना किंवा भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. तसेच इतरही अनेक नेते पक्षांतराच्या तयारीत आहेत. यावरून शरद पवार यांनी भाजप आणि शिवसेनेवर टीका केली आहे.

या टीकेला युवसेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी ‘आमचे खत चांगले आहे, त्यामुळे महाराष्ट्र हिरवागार आणि भगवा होणार असा विश्वास व्यक्त केला आहे. शरद पवार यांनी पक्षांतराच्या मुद्द्यावरून ज्यांनी पक्षांतर केले आहे ते निवडून येत नाहीत असा इतिहास आहे अस विधान केले होते. त्यामुळे त्यांच्या या विधानावर ठाकरे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त रविवारी अंधेरी मरोळ येथील वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना ठाकरे यांनी आज मी लावलेले हे विकासाचे झाड आहे. पर्यावरणाच्या रक्षणासाठी आहे. अस ठाकरे म्हणाले.

तसेच पुढे बोलताना, सर्वच राजकीय पक्षांनी वृक्षारोपणासाठी एकत्र आले पाहिजे. तसेच आमचे खत सगळीकडे चांगले आहे. आधी पावसाचे इनकमिंग होऊ दे त्यानंतर महाराष्ट्र हिरवागार आणि भगवा होईल असे आदित्य ठाकरे म्हणाले.