fbpx

इमारतींच्या पुनर्विकासातील अडथळे दूर करण्यासाठी कायदा करा : आदित्य ठाकरे

टीम महाराष्ट्र देशा : मुंबईच्या डोंगरी भागात कौसरबाग इमारत कोसळली आहे. दुर्घटनेत अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अश्या प्रकारच्या दुर्घटना थांबवण्यासाठी युवसेना प्रमुख आदित्य ठाकरेंनी इमारतींच्या पुनर्विकासातील अडथळे दूर करण्यासाठी कायदा करण्यात यावा अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

मुंबईच्या डोंगरी भागात असलेल्या इमारत दुर्घटनेनंतर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, मंत्री सुभाष देसाई, रवींद्र वायकर आणि मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी ठाकरे यांनी धोकादायक इमारतीच्या पुनर्विकासतील अडथळे दूर करण्यासाठी कायदा करण्यात यावा आणि इतरही मागण्यांचे निवदेन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनीही या मागण्यासंबंधी विचार करून लवकरात लवकर या मागण्या पूर्ण करू अस आश्वासन आदित्य ठाकरेंना दिले आहे.