fbpx

राज ठाकरेंकडून काय शिकलात, आदित्य ठाकरे म्हणतात…

टीम महाराष्ट्र देशा : शिवसेनेचे नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे सध्या जन आशीर्वाद यात्रेनिमित्त महाराष्ट्रभर दौरा करत आहेत. यानिमित्त ते अहमदनगरमध्ये आले होते. यावेळी त्यांनी महाविद्यालयीन युवकांशी संवाद साधला तसेच त्यांनी विद्यार्थ्यांचा प्रश्नांची उत्तरेही दिली.

या कार्यक्रमात आदित्य ठाकरे यांना राज ठाकरे यांच्याकडून आपण काय शिकलात असा प्रश्न विचारला त्यावर बोलताना ‘मी आजोबा व वडिलांकडूनच धडे घेतले आहेत,’ असं त्यांनी सांगितलं. ‘एकदा काम करायचे निश्चित केले की मागे फिरायचे नाही, अशी आजोबांची शिकवण होती. तर, जे करायचे ते प्रामाणिकपणे कर. खोटे बोलू नको व नाटके करू नको, अशी वडिलांची शिकवण आहे. बाकी धडे मी जनतेशी संवाद साधून घेतो,’ असं ते म्हणाले. हे सांगताना त्यांनी ‘खोटेपणा व नाटके करू नको’ या शब्दांवर विशेष जोर दिला त्यामुळे सभागृहात हशा पिकला.

दरम्यान, या यात्रेनिमित्त नाशिकमध्ये बोलताना आदित्य ठाकरे यांनी शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करुन देणारच अस विधान केले आहे. त्यामुळे भविष्यात नक्की ते त्यांच्या वाक्यावर ठाम राहतात का हे पाहन महत्वाच ठरणार आहे.