शिवसेनेचा विकासाला विरोध कधीही नव्हता;आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर

टीम महाराष्ट्र देशा:- नाणार प्रकल्पाला शिवसेनेने विरोध केला होता.मुख्यमंत्र्याच्या या विधानानंतर नाणार रिफायनरी प्रकल्पावरून पुन्हा भाजप- शिवसेना युतीमध्ये मोठी दरी निर्माण पडण्याची शक्यता आहे. नाणार प्रकल्पामुळे कोकणातील एक लाख बेरोजगारांना रोजगार मिळणार असेल तर या रिफायनरी प्रकल्पाचा फेरविचार करायला काहीच हरकत नाही. मी अगोदरपासूनच हा प्रकल्प व्हावा असे म्हणत होतो, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटले आहे.

लोकसभा निवडणुकांपूर्वी युती करताना शिवसेनेनं नाणारमधून रिफायनरी प्रकल्प हटवण्याची अट घातली आणि तसं करण्यासाठी भाजपला भाग पाडलं. मात्र विधानसभेपूर्वी शिवसेनेनं आरेवरून दबावाचं राजकारण सुरू केलं असताना, मुख्यमंत्र्यांनी नाणारसंदर्भात मोठं विधान केलं आहे.

दरम्यान, नाणार प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध असल्यामुळे शिवसेनेचा विरोध होता, पर्यावरणाचं नुकसान होणार नसेल, आणि नागरिकांची संमती असेल अशा जागी हा प्रकल्प उभारण्यास काही हरकत नाही, असं युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. शिवसेनेचा विकासाला विरोध कधीही नव्हता असं आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केल्याचं, पीटीआयचं वृत्त आहे.

महत्वाच्या बातम्या