आदित्य ठाकरे यांच्या रेंजरोव्हरला बसला खड्ड्यांचा फटका…

टीम महाराष्ट्र देशा – रस्त्यांवर असणाऱ्या खड्ड्यांचा त्रास सर्वसामान्यांना रोजच सहन करावा लागत असतो. मात्र युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनाही खड्ड्यांचा चांगलाच फटका बसला आहे. आदित्य ठाकरे नाशिक दौऱ्यावर जात असताना प्रवासात घोटीजवळ त्यांच्या आलिशान रेंजरोव्हर गाडीचा टायर फुटल्याची माहिती मिळाली आहे. यामुळे आदित्य ठाकरेंना नाइलाजाने दुसऱ्या गाडीने हॉटेलला पोहोचावं लागलं. या घटनेनंतर त्यांची टायर फुटलेली गाडी टायर बदलण्यासाठी नाशिकला आणली गेली. याआधीही रस्त्यावरील खड्ड्यांबाबत प्रशासनाकडे तक्रार केली असली तरी प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे.

 

ही तर महाविद्यालयाची परंपरा, ‘सत्यनारायण’ पूजेवर फर्ग्युसन प्राचार्यांचा दावा