सावंतवाडी : शिवसेना खासदार संजय राऊत यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अटक केली आहे. मध्यरात्री रात्री 12 वाजता ईडीने ही कारवाई केली. अटक करण्यापूर्वी संजय राऊत यांची 16 तास चौकशी करण्यात आली होती. त्यांना आज मुंबईतील पीएमएलए कोर्टात हजर करण्यात येणार आहे. अशातच आता शिवसेनेच्या पुनर्बांधणीसाठी उद्धव ठाकरेंचे पुत्र आदित्य ठाकरे मैदानात उतरले आहेत. आज आदित्य ठाकरे कोकणात शिवसंवाद यात्रेसाठी पोहोचले आहेत. यावेळी त्यांनी शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे.
यावेळी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले कि, चाळीसच्या चाळीस जागांवर निवडणुका घ्या. होऊन जाऊ द्या. सत्य जिंकतेय की सत्ता जिंकतेय होऊन जाऊ द्या, असं आव्हानच आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना आज केलं आहे. ज्यांना आपण उद्धव ठाकरेंना धोका द्यायचा नाही असं वाटत असेल तर त्यांनी परत यावं. त्यांच्यापैकी एकाचा मेसेज आला. गद्दार नाही विश्वासघातकी म्हणा. आता गद्दार आणि विश्वासघातकी यात फरक काय? असा सवाल करतानाच जो बुलंद आवाज आहे. प्रश्न विचारतोय ज्याचा आवाज बंद करायचा, त्याला दाबून टाकायचं हे सध्या सुरू आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
दीपक केसरकर यांचा मतदारसंघ असलेल्या सावंतवाडीमध्ये त्यांनी सभा घेतली. यावेळी त्यांनी बंडखोर गटावर जोरदार निशाणा साधला आहे. आम्हाला प्रचार करायची गरज नाही महाराष्ट्रच प्रचार करेल. गुवाहाटीमध्ये जेव्हा हे ४० गद्दार होते, तिथे खात पित होते, त्यावेळी या गद्दारांना आसाममध्ये आलेला पूर दिसला नाही का? गोव्यामध्ये जेव्हा हे टेबलवर नाचत होते, हे लोक तुमचा चेहरा होणार? मलाच लाज वाटते की मी एकेकाळी यांच्यासोबत फिरत होतो.
महत्वाच्या बातम्या :
- Vishwajeet Kadam | हुकुमशाही पद्धतीने केंद्रीय यंत्रणाचा गैरवापर सुरु – विश्वजित कदम
- Eknath Shinde | “रोज सकाळी वाजणारा भोंगा बंद झाला” ; एकनाथ शिंदेंचा संजय राऊतांना टोला
- Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांनी घेतली संजय राऊतांच्या कुटुंबीयांची भेट
- Kirit Somaiya “आगे आगे देखो होता है क्या” ; संजय राऊतांच्या अटकेवर किरीट सोमय्यांची प्रतिक्रिया!
- Rajan Vichare | “दिघे साहेब घात झाला… गद्दारीचा शिक्का बसला, छातीवर नाही पाठीवर वार झाला” ; राजन विचारेंचे भावूक पत्र
>>> TOP CATEGORIES - राजकारण । क्रीडा बातम्या । कृषी बातम्या । आरोग्य बातम्या | मनोरंजन बातम्या । नोकरी बातम्या । मुंबई बातम्या । पुणे बातम्या । औरंगाबाद बातम्या । नाशिक बातम्या। नागपूर बातम्या । व्हिडीओ बातम्या । Trending News <<<
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<