आदित्य ठाकरेंच्या हस्ते होणार विकासकामांचे उद्घाटन

aaditya

औरंगाबाद – मनपा निवडणुकीच्या तोंडावर विविध विकास कामांचे लोकार्पण शिवसेना नेते तथा राज्याचे पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. शनिवार 16 जानेवारी रोजी कांचन वाडी येथील बायोगास प्रक्रिया प्रकल्प, क्रांती चौकातील सायकल ट्रॅक, पोलीस आयुक्त कार्यालयातील सीसीसी सेंटर, टीव्ही सेंटर परिसरातील मिनी स्टेडियम आणि शॉपिंग कॉम्प्लेक्स यांचे लोकार्पण आदित्य ठाकरे करतील. शिवसेना आमदार तथा जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

त्याचप्रमाणे राज्याचे उद्योगमंत्री तथा औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते अमरप्रीत चौक येथील बाळासाहेब ठाकरे यांच्या म्युरलचे अनावरण, पडेगाव येथील कचरा प्रक्रिया केंद्राचे लोकार्पण, स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत रेल्वे स्टेशन येथे आउटडोर डिस्प्ले लोकार्पण तसेच चिकलठाणा येथील कचरा प्रक्रिया केंद्राचे लोकार्पण होणार आहे.

या दौऱ्यादरम्यान आदित्य ठाकरे औरंगाबाद शहरातील उद्योग, शिक्षण, प्रशासन, पर्यटन, पर्यावरण, आरोग्य अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांशी संवाद साधणार आहे. ‘संवाद विकासाचा’ या नावाने होणाऱ्या कार्यक्रमात पालकमंत्री सुभाष देसाई स्वतः प्रेझेंटेशन सादर करणार आहेत.

महत्वाच्या बातम्या