जनतेच्या मनात असेल तर आदित्य ठाकरे हे मुख्यमंत्रीही होतीलं

टीम महाराष्ट्र देशा : शिवसेनेचे खा. संजय राऊत यांनी आज विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाचा हक्क बजावला आहे. यावेळी त्यांच्यासह त्यांचे कुटुंब देखील भांडूप येथील मतदान केंद्रावर उपस्थित होते. यावेळी संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला.

ते म्हणाले की, महाराष्ट्राची ईच्छा असेल तर आदित्य ठाकरे मुख्यमंत्री होतील. तसेच महाराष्ट्रात चांगल्या प्रकारचा मतदान होईल. प्रत्येक जागा ही जिंकण्यासाठी लढायची असते, आमच्यासमोर एक उत्तम विरोधी पक्ष यावा, असं आम्हाला वाटतं, असेही राऊत म्हणाले.

दरम्यान ठाकरे घराण्यातील पहिले ठाकरे म्हणजे आदित्य ठाकरे हे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. वरळी विधानसभा मतदारसंघातून आदित्य ठाकरे निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे भाजप शिवसेना महायुतीची सत्ता आली तर आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री पद मिळणार का ? असा सवाल वारंवार शिवसेनेच्या नेत्यांना विचारला जातो. आज याचं प्रश्नावर संजय राऊत यांनी उत्तर दाखल सूचक विधान केले आहे.

महत्वाच्या बातम्या