मुंबई – राज्यातील शिवसेनेत फुट पडली आहे. शिवसेनेचे बंडखोर 40 आमदार शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे व युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करत आहेत. मुंबईतील शिवसेनेच्या एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांवर जोरदार टीका केली.
आदित्य ठाकरे म्हणाले की, 40 आमदारांच्या मनात जो राग-द्वेष दिसतो, तो नक्की कशामुळे आहे. त्यांना पक्ष प्रमुख व पक्षाने जे काही दिले आहे. ते सर्व देऊन देखील आम्ही अशी काय चूक केली की ज्यामुळे यांनी पाठीत खंजीर खुपसला. जी काही सत्ता आली ती त्यांना प्रथम मिळाली. फंड, निधी प्रथम मिळाला. मग चूक आम्ही काय केली, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
महत्वाच्या बातम्या :
- Ajit pawar | अडेलतट्टूपणाची भूमिका न घेता सर्वोतोपरी मदत करावी- अजित पवार
- Sanjay Raut । स्वतःचा पक्ष स्थापन करा आणि अस्तित्व दाखवा; संजय राऊतांच शिंदेंना आव्हान
- Abdul Sattar | अब्दुल सत्तारांना अर्जुन खोतकरांच्या शिंदे गटात प्रवेशाची भलतीच घाई! म्हणाले…
- Sanjay Raut । “जनतेत जाऊन सत्ता परिवर्तन करणार”; संजय राऊत पुन्हा आक्रमक
- Abdul Sattar । तीन तारखेच्या आत गॅरींटीने सांगतो मंत्रीमंडळाचा विस्तार होईल – अब्दुल सत्तार
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<