Share

Aditya Thackeray | “खोके सरकार नंतर आता घोषणा सरकार”, आदित्य ठाकरे कडाडले

Aditya Thackeray | मुंबई : जुलैमध्ये झालेल्या राजकीय नाटकानंतर राज्यात सत्तांतर झाली. त्यानंतर सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर जोरदार हल्लाबोल करताना दिसतात. एवढंच नाही तर एकनाथ शिंदे यांच्या बंड मध्ये सहभागी असलेल्या आमदरांना खोके आमदार असं देखील संबोधित करण्यात आलं असून खोके सरकार, असा नारा देखील विरोधकांनी लावला होता. अशातच शिवसेना उद्धब बाळासाहेब ठाकरे (Shivsena Uddhav Balasaheb Thackeray) पक्षातील नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

हे सरकार अजून राजकारणातच अडकलं आहे, घटनाबाह्य सरकारने कामही करायची असतात, हे त्यांना अजून जाणवले नाही. राज्यात केवळ आश्वासनांवर आश्वासने आणि घोषणांवर घोषणा देणे सुरू आहे, जनतेचा आवाज कुठेही ऐकला जात नाही, त्यामुळे या सरकारला ‘घोषणा सरकार’, ‘खोके सरकार’ अशी अनेक नावे मिळाली आहेत. आपण काम करणे गरजेचे आहे, हेही ते विसरून गेले आहेत, असा घणाघात आदित्य ठाकरेंनी केला आहे.

या सरकारला आता शरम उरली नाही, अशी खोचक टीका देखील आदित्य ठाकरेंनी केली आहे. राज्यातील प्रत्येक बस स्थानकावर शिंदे सरकारचे होर्डिंग्स लागले आहेत. या होर्डिंगसाठी पैसे दिले आहेत की नाही? हे अजूनही माहीत नाही. दिले असतील तर कुणी दिले? आणि दिले नसतील तर याची नुकसानभरपाई कोण करणार? हेही माहीत नाही, असं देखील आदित्य ठाकरे म्हणाले.

दरम्यान, शहरात अनेक ठिकाणी बेकायदेशीर बॅनर लावले असून महापालिकेकडून कुठेही कारवाई केली जात नसल्याचं आदित्य ठाकरेंनी सांगितलं आहे. एवढे सगळे राजकीय होर्डिंग्स बघून मला मळमळायला लागलं, असं देखील ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :

Aditya Thackeray | मुंबई : जुलैमध्ये झालेल्या राजकीय नाटकानंतर राज्यात सत्तांतर झाली. त्यानंतर सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर जोरदार हल्लाबोल करताना …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now