‘खड्डे दाखवल्याबद्दल आदित्य ठाकरेंना बक्षीस पाठवा’- मुंडे

dhananjay-munde..

मुंबई: रस्त्यांवर असणाऱ्या खड्ड्यांचा त्रास सर्वसामान्यांना रोजच सहन करावा लागत असतो. मात्र युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनाही नुकताच खड्ड्यांचा फटका बसला आहे. आदित्य ठाकरे नाशिक दौऱ्यावर असून यावेळी प्रवासात असताना घोटीजवळ त्यांच्या आलिशान रेंजरोव्हर गाडीचा टायर फुटल्याची माहिती मिळाली आहे.

आदित्य ठाकरे यांच्या गाडीचा टायर फुटल्याची बातम्या प्रसिद्ध होऊ लागताच विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सेना आणि भाजपावर निशाणा साधला. खड्डा दाखवा बक्षीस मिळवा योजनेतील हजार रुपये आता मित्रपक्ष शिवसेना आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना पाठवा, असा चिमटा विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांना काढला आहे.

या घटनेनंतर आदित्य ठाकरे दुसऱ्या गाडीने गेले. तसेच त्यांची टायर फुटलेली गाडी टायर बदलण्यासाठी नाशिकला आणली गेली. याआधीही रस्त्यावरील खड्ड्यांबाबत प्रशासनाकडे तक्रार केली असली तरी प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे.