प्रेमविवाह न करण्याच्या ‘त्या’ शपथेवर आदित्य ठाकरे म्हणतात…

मुंबई : ” ‘कोणी कुणाशी विवाह करावा आणि कसा करावा, हा ज्याचा-त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यात इतरांनी लक्ष घालू नये किंवा तशी कोणावर बळजबरी केली जाऊ नये.’ असे म्हणत पर्यवरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी अमरावतीमधील एका शाळेत विद्यार्थ्यांना प्रेमविवाह न करण्याची शपथेवर प्रतिक्रिया दिल्या आहेत.दादरच्या शिवाजी मंदिर येथे महापालिका शाळांच्या मुख्याध्यापकांची कार्यशाळा झाली. त्या कार्यशाळेत ते बोलत होते.

दरम्यान, जागतिक प्रेमदिनाच्या दिवशीच अमरावती जिल्ह्यातील चांदुर रेल्वे येथील महिला आणि कला महाविद्यालयात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. या महाविद्यालातील विद्यार्थिनींना ‘व्हॅलेंटाईन्स डे’च्या निमित्ताने प्रेमविवाह आणि हुंडा घेऊन लग्न न करण्याची शपथ देण्यात आली आहे. विशेष म्हणजे शिक्षकांनीच या विद्यार्थीनीना हि शपथ दिली आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यभरातून या घटनेवर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत.

Loading...

‘मी अशी शपथ घेते की, माझा माझ्या आई-वडिलांवर पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे समोर घडणाऱ्या घटना लक्षात घेता, मी प्रेम व प्रेम विवाह करणार नाही. त्याशिवाय मी माझे लग्न हुंडा घेणाऱ्या मुलाशी करणार नाही. सामाजिक परिस्थितीमुळे आज माझे लग्न माझ्या कुटुंबाने हुंडा देऊन केले, तर भावी पिढीतील एक माता म्हणून मी माझ्या होणाऱ्या सूनेकडून हुंडा घेणार नाही. तसेच मुलीसाठी हुंडा देणार नाही. एक सामाजिक कर्तव्य म्हणून मी ही शपथ घेते’अशी शपथ महाविद्यालयातील शिक्षकांनीच विद्यार्थिनींकडून घेतली आहे.

मात्र भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ट्वीट करत त्यांनी याबाबत आक्षेप नोंदविला आहे. ” अमरावतीतील चांदुर येथील शाळेत मुलींना प्रेम आणि प्रेम विवाह न करण्याची शपथ हा कमालीचा विचीत्र प्रकार घडला. शपथ मुलींनाच का? आणि ती ही प्रेम न करण्याची. ‘मुलींपेक्षा मुलांनी शपथ घ्यायला पाहिजे की एकतर्फी प्रेमातून मुलींना त्रास देणार नाही, कोणावर ऍसिड फेकणार नाही, जिवंत जळणार नाही, वाकड्या नजरेने बघणार नाही आणि जर कोणी बघितलं तर त्याला जबरदस्त जवाब देणार.. असेही त्यांनी आपल्या ट्वीट मध्ये म्हंटले आहे.

Loading...
Loading...




Loading…




Top Posts

‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
कोरोनाला घालवण्यासाठी देशाला 21 नाही तर 49 दिवसांच्या लॉकडाऊनची गरज !
तब्लिगींमुळे चार दिवसांत कोरोनाचे रुग्ण दुप्पट, पवार म्हणतात ‘ते’ दाखवण्याची गरज आहे का ?
'१४ एप्रिलनंतर महानगरं आणि बाधित जिल्हे वगळून ग्रामीण भागातील लॉक डाऊन उठवावे'
आमदार साहेब गोरगरिबांच्या अन्नात माती कालवू नका, राष्ट्रवादी-शिवसेनेतील वाद आला चव्हाट्यावर
संतापजनक : तब्लिगींमुळे चार दिवसांत कोरोनाचे रुग्ण दुप्पट
कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना माझा सलाम ; या दिग्गज कलाकाराने केलं कौतुक
चीनने पाकिस्तानची केली क्रूर चेष्टा; N-95 मास्क ऐवजी चक्क अंडरवेअर पासून बनविलेले मास्क पाठवले
काय फरक पडतो म्हणणाऱ्या राज ठाकरेंनाच बसला कोरोनाचा फटका