Share

Aditya Thackeray | “आदित्य ठाकरे कोण?, मला माहिती नाहीत”, म्हणणाऱ्या तानाजी सावंताना आदित्य ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले…

Aditya Thackeray | मुंबई : तानाजी सावंत यांच्या मतदारसंघात आदित्य ठाकरे यांनी मंगळवारी शेतकऱ्यांशी संवाद साधला. तानाजी सावंत हे गद्दार असल्याची टीका त्यांनी यावेळी बोलताना केली. तसेच तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी केलेल्या टीकेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवा नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

यावेळी, काही दिवसांपूर्वी आदित्य ठाकरे कोण आहेत? फक्त एक आमदार, अशी टीका तानाजी सावंत यांनी केली होती. याला प्रत्युत्तर देत मी आदित्य उद्धव ठाकरे साधा आमदार असून महाराष्ट्राचा आमदार आहे, असे उत्तर आदित्य ठाकरे यांनी दिलं आहे.

मी ज्या रस्त्याने आलो त्या रस्त्यावर खड्डे पडले आहेत. महाविकास आघाडी सरकारने मंजूर केलेले पैसे रद्द केले गेले. याच रस्त्याचा त्रास मला झाला. मला वाटलं की रस्त्यावर खेकडे आले की काय?, असा टोला देखील आदित्य ठाकरेंनी लगावला आहेत.

दरम्यान, तानाजी सावंत यांनी आदित्य ठाकरे कोण आहेत? मला माहित नाही. ते फक्त आमदार आहेत, एवढंच मला माहिती आहे, असं वक्तव्य काही दिवसांपूर्वी केलं होतं. त्याला आदित्य ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिलं. आदित्य ठाकरे मंगळवारी तानाजी सावंत यांच्या मतदारसंघात शेतकऱ्यांच्या भेटीगाठी घेत शेतकऱ्यांची संवाद साधला आहे.

महत्वाच्या बातम्या :

Aditya Thackeray | मुंबई : तानाजी सावंत यांच्या मतदारसंघात आदित्य ठाकरे यांनी मंगळवारी शेतकऱ्यांशी संवाद साधला. तानाजी सावंत हे गद्दार …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now