Aditya Thackeray | मुंबई : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांनी शिवाजी महाजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करत त्यांची तुलना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत केली होती. यानंतर सर्वत्र संताप पाहिला मिळाला आहे. अशातच त्यांच्याविरोधात याचिका दाखल करण्यात आली असून त्यांना पदावरुन हटवण्याची मागणी करण्यात येत आहे. याला किती जण सहमत आहे हे युवा नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या पोलने सिद्ध केलं आहे.
आदित्य ठाकरे यांनी ट्वीटरवर एक पोल घेतला. त्याचा निकाल आता समोर आला आहे. या निकालातूनही राज्यपाल कोश्यारींना महाराष्ट्रातून हटवण्याची मागणी समोर येत आहे. तसं पाहता असं विधान करण्याची त्यांची पहिले वेळ नसल्याने आता अनेकांनी आक्रमक भूमीका घेतली आहे.
राज्यपालांना आपल्या देशाच्या राष्ट्रपती महोदयांनी पदमुक्त केले पाहिजे का?, असा प्रश्न आदित्य ठाकरेंनी ट्वीटर पोलमध्ये विचारला आहे. त्याखाली त्यांनी होय, उशीर झाला आहे, नाही, मी महाराष्ट्र द्वेषी असे तीन पर्याय दिले आहेत.
महाराष्ट्रद्वेषी राज्यपालांना आपल्या देशाच्या राष्ट्रपती महोदयांनी पदमुक्त केले पाहिजे का?
— Aaditya Thackeray (@AUThackeray) November 21, 2022
दरम्यान, सर्वाधिक मते होय अशी आली आहे. जवळपास 79.5 टक्के नागरिकांनी राज्यपालांना महाराष्ट्रातून हटवण्याच्या मागणीचं समर्थन केलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Sudhir Mungantiwar | भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी स्वतःच सांगितला सरकार पडण्याचा मुहूर्त
- Naresh Mhaske | “बोलक्या पोपटाला जे शिकवतो, तेच बोलतो”, सुषमा अंधारेंवर नरेश म्हस्केंचा खोचक टोला
- Thackeray-Shinde | ठाकरे अन् शिंदे गट पुन्हा आमने-सामने!, ‘गद्दार’ची पुन्हा घोषणाबाजी
- Naresh Mhaske | “…अन् अशा लोकांना भेटायची वेळ आली”, आदित्य ठाकरेंच्या बिहार दौऱ्यावर नरेश म्हस्केंचं टीकास्त्र
- Anil Parab | किरीट सोमय्या नारायण राणेंच्या घरी हातोडा का नेत नाहीत?, अनिल परबांचा खोचक सवाल