Aditya Thackeray | मुंबई : राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे. ठाकरे विरुद्ध शिंदे गटात कलगीतुरा रंगलेला असतानाच दुसरीकडे सत्ताधारी पक्षांवर टीका करण्याची एकही संधी विरोधक सोडत नाहीयेत. अशातच राज्य मंत्रिमंडळाची बैठक रद्द झाल्याने आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
युवासेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे हे सध्या बिहारच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते बिहारचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख नेते तेजस्व यादव यांची भेट घेणार आहेत. बिहारला रवाना होण्यापूर्वी मुंबईत माध्यमांशी संवाद साधताना आदित्य ठाकरे यांनी सरकारवर निशाणा साधला.
दुसऱ्या राज्यातील निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळांची (Maharashtra Cabinet Meeting) बैठक रद्द केली असल्याचं आदित्य ठाकरे म्हणालेत. आधी प्रकल्प पाठवले आता मंत्रिमंडळ पाठवलं, असं म्हणत आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर (Shinde Fadnavis Government) टीका केली.
दरम्यान, आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याबद्दल संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाष्य केलं आहे. ते म्हणाले, आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याकडे बिहारचा दौरा म्हणून बघू नका. ते शिवसेनेचे प्रमुख नेते आहेत. या दौऱ्याकडं राष्ट्रीय दौरा म्हणून बघा, त्याला राष्ट्रीय दौरा म्हणून महत्व दिलं पाहिजे असेही राऊत म्हणाले. तसेच तेजस्वी यादव यांनी बिहारमध्ये नितीश कुमारांच्या मदतीनं परिवर्तन घडवून आणले आहे. अडीच वर्षापूर्वी आम्ही देखील राज्यात परिवर्तन केलं होतं. आता पुन्हा महाराष्टात परिवर्तन करण्याची तयारी सुरु झाल्याचा सुचक इशारा राऊतांनी दिला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Sanjay Raut | “सरकार माझ्या जीवाशी खेळत आहे, काही बरं वाईट…”; संजय राऊतांचे गंभीर आरोप
- Urfi Javed | अशी कोणती ही फॅशन?, कपडे सोडून उर्फीने समोर ठेवले दोन ग्लास
- Sanjay Raut | “लवकरात लवकर राज्यातील सरकार घालवलं नाही तर…”; संजय राऊतांचं मोठं भाकीत
- Gajanan Kale | ‘केम छो’च्या नंतर ‘कईसन बा’चा प्रयोगासाठी छोटे पप्पू रवाना ; मनसेचा आदित्य ठाकरेंना टोला
- SBI Recruitment | भारतीय स्टेट बँक यांच्यामार्फत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू