fbpx

राहुल गांधी पंतप्रधान झाले तर देशाचे कार्टून नेटवर्क होईल : आदित्य ठाकरे

टीम महाराष्ट्र देशा : शिवसेनेचे युवानेते आदित्य ठाकरे या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात चांगलेच सक्रीय झाल्याचे दिसत आहे. तर एका प्रचार सभेत आदित्य यांनी कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची खिल्ली उडवली आहे. राहुल गांधी जर देशाचे पंतप्रधान झाले तर देशाचे कार्टून नेटवर्क होईल अशी उपहासात्मक टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे. तर नरेंद्र मोदींशिवाय देशाला पर्याय नाही असे देखील ते यावेळी म्हणाले. ते शिर्डी येथील शिवसेनेचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारार्थ आले असता प्रचार सभेत बोलत होते.

राहुल गांधी जर देशाचे पंतप्रधान झाले तर देशाचं काय होईल. आपला देश कुठं जाईल,. देशाचं कार्टुन नेटवर्क होईल. असा टोला आदित्य यांनी लगावला. तर आदित्य यांच्या या विधानाला उपस्थितांनी देखील चांगलीच दाद दिली. तसेच आदित्य यांनी उपस्थितांना देशाचा पंतप्रधान कोण होऊ शकत? आणि मोदींशिवाय देशाला दुसरा पर्याय आहे का? असा प्रश्न विचारला. तसेच  आदित्य यांनी सदाशिव लोखंडे यांच्या एकनिष्ठतेचे कौतुक केले. तर सदाशिव लोखंडे हे  जनतेतून जनतेच्या सेवेसाठी आले आहेत असे ते यावेळी म्हणाले.

दरम्यान शिर्डी लोकसभा मतदार संघातून युतीकडून शिवसेनेचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवण्यात आले आहे. त्यांना टक्कर देण्यासाठी कॉंग्रेस आघाडी कडून भाऊसाहेब कांबळे यांना उतरवण्यात आले आहे. गेल्या २ लोकसभा निवडणुकांमध्ये शिवसेनेने हा गड आपल्या ताब्यात ठेवला आहे. त्यामुळे कॉंग्रेस आघाडीकडून शिवसेनेच्या या गडाला सुरुंग लावण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरु आहेत.