Share

Aditya Thackeray | “सौदर्यींकरण म्हणजे केवळ एलईडी लाईट लावणं नव्हे”; आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना टोला

Aaditya Thackeray । मुंबई : राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे. ठाकरे विरुद्ध शिंदे गटात कलगीतुरा रंगलेला असतानाच दुसरीकडे सत्ताधारी पक्षांवर टीका करण्याची एकही संधी विरोधक सोडत नाहीयेत. अशातच मुंबई महापालिकेच्या कारभारावरून ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी सरकारला लक्ष्य केलं आहे. मुंबई महापालिकेत टेंडर, ट्रान्स्फर आणि टाईमपास सुरू आहे, असा आरोप आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी केलाय.

ते म्हणाले, “मुंबई सोन्याची अंडे देणारी कोंबडी ही त्यांच्यासाठी असेल आमच्यासाठी ही कर्मभूमी आहे. गेल्या तीन महिन्यात मुंबईत किती इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट बंद झाले, नवे किती सुरु झालेत ? चांगले काम करणारे अधिकारी आहेत.  त्यांच्या 90 दिवसात 6 बदल्या झाल्या आहेत. काहींच्या तर 24 तासात बदल्या करण्यात आल्या. प्रशासनात इतक्या तडकफडकी बदल्या होत नाहीत. एवढ्या गोंधळ का होतय? कोणाच्या आदेशाने सगळं हे होतय? असं म्हणत त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला.

मुंबईत पाच हजार कोटींचे रस्ते बनवणार तरी कसे? असा सवालही त्यांनी केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेमुळे मुंबईतील इतर रस्त्यांची कामं रखडली आहे, असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे. मुंबईकरांच्या खिशातून शहराच्या सौंदर्यीकरणासाठी १७०० कोटींचा निधी देण्यात आला आहे. हे सौंदर्यीकरण नेमकं कसं करण्यात येणार आहे? असा सवाल करत सौदर्यींकरण म्हणजे केवळ एलईडी लाईट लावणं नव्हे, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या :

Aaditya Thackeray । मुंबई : राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे. ठाकरे विरुद्ध शिंदे गटात कलगीतुरा रंगलेला असतानाच दुसरीकडे सत्ताधारी …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now