Aditya thackeray | मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या हातातलं बाहुलं असल्याची टीका ठाकरे गटाकडून केली जाते. फडणवीसांनी लिहिलेल्या स्क्रिप्ट शिंदे भाषणात वापरतात असंही म्हंटल जातं. यामुळे मुख्यमंत्री नेमके कोण आहेत? हा प्रश्न असल्याचा टोला ठाकरे गटाकडून लगावला जातोय. अशातच आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनीही यासंदर्भात भाष्य करत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. मुंबईमध्ये एका कार्यक्रमासाठी हजेरी लावलेल्या आदित्य ठाकरेंनी पत्रकारांशी बोलताना राज्य सरकारवर सडकून टीका केली.
ते म्हणाले, “महाविकास आघाडीच्या काळात आम्ही दावोसला गेलो, तेव्हा ८० हजार कोटींची गुंतवणूक राज्यात आणली. त्यानंतर सरकार पाडलं गेलं. वेदांत फॉक्सकॉन, बलट्रक पार्क, मेडिकल डिव्हाईस पार्क हे प्रकल्प राज्यातून निघून गेले. आता वेगवेगळ्या राज्यातून मुख्यमंत्री आपल्या राज्यात येऊन सादरीकरण करत आहेत. पण अजूनही आपले दोनपैकी जे कुणी खरे मुख्यमंत्री असतील, त्यांचं उत्सव मंडळं, १२-१ वाजेपर्यंत उत्सवाला परवानग्या हेच सगळं चालू असल्याचं आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) म्हणाले. कुठेही महिला, बेरोजगार तरुण, शेतकऱ्यांसाठी ते बोलत नाहीयेत”, अशा शब्दांत आदित्य ठाकरेंनी शिंदे-फडणवीसांना टोला लगावला.
आदित्य ठाकरे म्हणाले, “परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे. आम्ही तेव्हाही सांगत होतो की ओला दुष्काळ जाहीर करावा. आत्ताही तशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेकदा सरकारकडून फक्त घोषणा झाली आहे. पुढे त्यावर काही झालं नाही. त्यासाठीच उद्धव ठाकरे स्वत: बांधावर जाणार आहेत आणि काही शेतकरी बांधवांचीही भेट असल्याचं आदित्य ठाकरे म्हणालेत.
यावेळी आदित्य ठाकरेंनी बोलताना राज्यातील उद्योग बाहेर जात असल्यावरूनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं. “वेगवेगळ्या राज्यांमधून आपल्याकडे मुख्यमंत्री येत आहेत. त्यांच्या राज्यांमधली औद्योगिक धोरणं सांगतायत. अनेकदा आपल्याकडचे उद्योगही घेऊन जातात. पण हे होत असताना कुठेही आपले मुख्यमंत्री त्यांच्याकडे गेल्याचं दिसत नाहीये”, असं म्हणत आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टोला लगावला.
महत्वाच्या बातम्या :
- Skin Care Tips | ‘या’ घरगुती पद्धती वापरून त्वचेवरील टॅनिंग करा दूर
- Sushma Andhare । मिलिंद नार्वेकर शिंदे गटात जाणार का?; सुषमा अंधारे म्हणाल्या…
- Weight Loss Tips | वजन कमी करायचे असेल तर आहारात ‘या’ गोष्टींचा करा समावेश
- Vaibhav Naik | “हिम्मत असेल तर निलेश राणेंनी…”; वैभव नाईकांचं खुलं आव्हान
- Travel Guide | ऐतिहासिक वारसा आणि नैसर्गिक सौंदर्य यांचा अनोखा संगम बघायचा असेल तर भारतातील ‘या’ ठिकाणांना द्या भेट