Share

Aditya Thackeray | “…एवढं केलं तरी पुरेसं आहे”; आदित्य ठाकरेंचा शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा

Aditya Thackeray | मुंबई : परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे खूप नुकसान झाले आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेत्यांकडून राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली जात आहे. परंतू राज्य सरकारकडून अद्याप याबाबत कोणतीही दखल घेतली जात नसल्याचं दिसून येतं आहे. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे.

काय म्हणाले आदित्य ठाकरे (Aditya Thackeray)

मागच्या आठवड्यात महाराष्ट्रात परतीचा पाऊस पडला. त्याआधीपासून आम्ही ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करत आहोत. शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देणं गरजेचं आहे. आज मी, अंबादास दानवे, सचिन अहिर आम्ही सगळे शेतकऱ्यांना धीर द्यायला जात आहोत. सरकार कितीही घटनाबाह्य असलं, तरी सरकारी यंत्रणेकडून मदत लगेच झाली पाहिजे, असं आदित्य ठाकरे यांनी सांगितलं आहे.

त्याचबरोबर आदित्य ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर जाणार आहेत.यासंदर्भात प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारला लक्ष्य केलं आहे. सत्ताधाऱ्यांकडून आत्ता तरी शेतकऱ्यांच्या भेटी घेण्याची अपेक्षा नाही. कारण हे सरकार निर्दयी झालं आहे. शेतकऱ्यांसोबत उभं राहाणं गरजेचं आहे. त्यांना जाऊन धीर देणं एवढं जरी केलं तरी पुरेसं आहे, असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे.

तसेच,गेल्या 10 वर्षांमध्ये उद्धव ठाकरेंनी अगदी बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या भेटीगाठी घेतल्या आहेत. सत्तेत आल्यानंतर लगेच कर्जमुक्ती देणारं आमचं कदाचित पहिलंच सरकार होतं. जरी विरोधी पक्षात असलो, तरी राजकीय समाज म्हणून आमचं कर्तव्य आहे की आम्ही शेतकऱ्यांसोबत जाऊन उभं राहावं, असंही आदित्य ठाकरेंनी म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या :

Aditya Thackeray | मुंबई : परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे खूप नुकसान झाले आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेत्यांकडून राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now