मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात सरकार स्थापन केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण मात्र पूर्णपणे अस्थिर झालं आहे. यावर्षी शिवसेनेचे मुबंईत दोन दसरा मेळावे पार पडले. त्यामुळे राजकीय वातावरण हाय होल्टेज झाल होत. यानंतर काल दिवसभर देखील याच मेळाव्यांची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्यातील आरोप प्रत्यारोप दसरा मेळाव्यात शिगेला पोहोचले होते. उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यातून शिंदे गटावर कडाडून टीका केली. यानंतर आज केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंच्या सभेचा खरपूस समाचार घेतला आहे. यावेळी बोलताना त्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर देखील निशाणा साधला आहे.
मॉडेल दिशा सॅलियन खून प्रकरणात माजी मंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचा संबंध असल्याचे बोलले जात असल्याचा गंभीर आरोप केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी आज केले. आता ठाकरेंचे सरकार नाही. आमचे सरकार आहे. त्यामुळे आता चौकशी होणारच असा इशाराही राणे यांनी दिला. या प्रकरणात यापूर्वी मी थेट नाव घेतले नव्हते. मात्र, आज थेट नाव घेत आहे.
या प्रकरणाची सर्वजण चर्चा करीत आहेत. खासगीत अनेकजण बोलत असून आता या प्रकरणाची चौकशी केली तर सगळं बाहेर येईल, असे राणे यांनी सांगितले. मॉडेल दिशा सॅलियान प्रकरणात राणे आणि त्यांचे चिरंजीव आमदार नितेश राणे यांच्याकडून गेल्या एक-दीड वर्षभरापासून अप्रत्यक्षपणे वारंवार आदित्य ठाकरे यांचे नाव घेण्यात येत होते. मात्र, आज प्रथमच राणे यांनी या प्रकरणात आदित्य ठाकरे यांचे नाव जाहीरपणे घेतले आहे.
दरम्यान, नारायण राणे यांनी ठाकरेंच्या एकेरी भाषेत उल्लेख करुन भाजपवर केलेल्या टीकांना जोरदार प्रत्युत्तर दिल आहे. राणे म्हणाले कि, आमच्या नेत्यांना काही बोललेलं खपवून घेणार नाही. देशाची कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचे काम करु नका. काही झालं तरी उद्धव ठाकरे जबाबदार असतील. थोडी तरी मर्यादा ठेवा. तुम्ही मंत्रालयात येऊ शकत नाही. वीस मिनिटे हा माणूस चालू शकत नाही. त्याला सतत डॉक्टरांचा सल्ला लागतो. अशा एकेरी शब्दांत राणे यांनी ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.
महत्वाच्या बातम्या :
- evendra Fadanvis | उद्धव ठाकरेंनी आपले शब्द मागे घ्यावेत, जाहीर माफी मागावी-देवेंद्र फडणवीस
- Travel Guide | ‘हे’ 5 हिंदी भाषिक देश फिरण्यासाठी ठरतील सर्वोत्तम ठिकाणं
- Narayan Rane । उद्धव ठाकरे यांचा शिवाजी पार्कवरील मेळावा म्हणजे तमाशाकारांचा मेळावा; नारायण राणेंचा घणाघात
- Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांचा पक्षप्रमुखाबरोबरच पक्षाध्यक्षाचाही दावा
- Narayan Rane । “उद्धव ठाकरे लबाड लांडगा आहे, त्यानं…”; नारायण राणेंची जीभ घसरली