Share

Aditya Thackeray | “आतापर्यंत जे राजकराण झालं त्याला पातळी होती, पण…”; आदित्य ठाकरेंचा बावनकुळेंवर हल्ला

Aditya Thackeray | मुंबई : भाजप पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी घडयाळ बारामतीत बंद पाडले पाहिजे, कॉँग्रेसचा पंजा साकुलीत थांबला पाहिजे आणि उद्धव ठाकरेंनी हाती घेतलेली मशाल अरबी समुद्राचे पाणी आणून कशी विझवायची हेच आमचे टार्गेट आहे, असं वक्तव्य केलं होतं. त्याचबरोबर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आता स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांपासून दूर गेले आहेत अशी टीकाही त्यांनी केली होती. त्यांच्या याच वक्तव्यावर शिवसेना पक्षाचे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी भाष्य केलं आहे.

काय म्हणाले आदित्य ठाकरे 

त्यांना बोलू दे, यातून त्यांची वृत्ती समोर येत आहे, असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांना प्रत्युत्तर दिलं आहे. प्रसार माध्यमांशी आदित्य ठाकरेंनी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.

राजकारणाची पातळी घसरत चालली 

पुढे बोलताना त्यांनी असंही म्हटलं की, सूडबुद्धीने काम सुरु असून द्वेषाचं राजकारण केलं जात आहे. आतापर्यंतच्या निवडणुकीमध्ये एकमेकांना संपवण्याची अशी भाषा कोणीही वापरली नव्हती. आतापर्यंत जे काही राजकराण झालं आहे त्याला पातळी होती. पण गेल्या पाच सहा वर्षात रुपयाप्रमाणे ती पातळी घसरत चालली आहे.

आदित्य ठाकरेंचा नारायण राणेंवर हल्ला

दरम्यान, मुंबईमध्ये फक्त भाजपचा खासदार निवडून येईल असा विश्वास केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी व्यक्त केला होता. त्यावर बोलताना आदित्य ठाकरे ( Aditya Thackeray ) म्हणाले की, निवडणूक येईपर्यंत ते भाजपामध्ये राहतील का? हा त्यांचा चौथा पक्ष आहे. मी त्यांच्यावर जास्त बोलत नाही. कारण जेव्हापासून त्यांनी गद्दारी केली आणि पक्ष सोडून गेले तेव्हापासून ते आपल्या कामाबद्दल अजिबात बोललेले नाहीत.

महत्वाच्या बातम्या :

Aditya Thackeray | मुंबई : भाजप पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी घडयाळ बारामतीत बंद पाडले पाहिजे, कॉँग्रेसचा पंजा …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics