आदित्य ठाकरेंनी केले प्लास्टिक वेष्टनाचा आणि बाटल्यांच्या कचऱ्याचे व्यवस्थापन करण्याचे आवाहन

टीम महाराष्ट्र देशा : पॅकींगसाठी प्लास्टिक वेष्टनाचा वापर करणाऱ्या विविध उत्पादनांच्या कंपन्यांसमवेत आज पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी बैठक घेतली. सायन येथील महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयात हि बैठक पार पडली. यावेळी वापर झालेल्या प्लास्टिकचे व्यवस्थापन करणे, वापरलेले प्लास्टिक ग्राहकांकडून परत मिळविणे, त्याची रिसायकलींग करणे, याविषयावर बैठकीत चर्चा करण्यात आली.

यावेळी बोलताना पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने विविध कंपन्यांनी प्लास्टिक कचरा व्यवस्थापनाच्या मोहिमेत योगदान द्यावे, असे आवाहन मंत्री ठाकरे यांनी केले. तसेच प्लास्टिकच्या पिशव्यांना बंदी घातली असली तरी बाजारात मिळणारी विविध प्रकारची पेये, पाण्याच्या बाटल्या आदी उत्पादनांच्या वेष्टनासाठी प्लास्टिकच्या वापरास संमती आहे. ग्राहकांकडून या उत्पादनांचा वापर झाल्यानंतर निर्माण होणाऱ्या प्लास्टिकच्या कचऱ्याचा प्रश्न आता आपल्यासमोर आहे. या प्लॅस्टिकच्या कचऱ्याचे व्यवस्थापन होणे गरजेचे असल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

Loading...

बिस्लरी, प्रॉक्टर अँड गॅम्बल, आयटीसी, हिंदुस्थान युनिलिवर, हल्दीराम, कोका कोला, कॅडबरी, पेप्सी, पारले आदी विविध कंपन्यांचे तसेच ऑल इंडिया प्लास्टिक मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन, ग्रेटर मुंबई पेट बॉटल पॅकेजींग असोसिएशन आदींचे प्रतिनिधी बैठकीस उपस्थित होते. झालेल्या या बैठकीस पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे, मंडळाचे अध्यक्ष सुधीर श्रीवास्तव, सदस्य सचिव ई. रवींद्रन आदी मान्यवर उपस्थित होते.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी आता 'या' दिवशी जाहीर होणार
यापुढे मी इंदुरीकरांना महाराज म्हणणार नाही - तृप्ती देसाई
तर पवारांची औलद सांगणार नाही, अजित पवारांची भीष्मप्रतिज्ञा
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
दणका राज ठाकरेंचा ! औरंगाबादमध्ये 'मनसे गद्दाराची' केली 'हकालपट्टी'
गोपीनाथ मुंडेंच्या आग्रहाला 'बळी' पडलो; मोदींवर विश्वास ठेवला, मात्र घडलं 'भलतंच'
जयंत पाटील आणि मी अडचणीतले 'प्रदेशाध्यक्ष' : बाळासाहेब थोरात