Aditya Thackeray | औरंगाबाद : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवा नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. आदित्य ठाकरे औरंगाबाद दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या शिल्लोड बालेकिल्ल्यात सभा घेतली. यावेळी त्यांनी अब्दुल सत्तांरांनी राष्ट्रवादी नेत्या सुप्रिया सुळे यांच्याबाबत सत्तारांनी केलेल्या वक्तव्यावर देखील त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
यादरम्यान, हे घटनाबाह्य कृषी मंत्री आक्षेपार्ह विधान करतात. असलं घाणेरडे मी सांगू पण शकणार नाही. असे घाणेरडे बोलणारे कृषिमंत्री तुम्हाला हवेत का ? असे लोक तुम्हाला पक्षात हवेत का, असे सवाल आदित्य ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना केले आहेत.
अब्दुल सत्तार यांच्या अशा विधानांमुळे देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा मलीन होत आहे. देवेंद्र फडणवीस यांचं नाव अशा विधानांमुळे खराब होत आहे. मी जर उप मुख्यमंत्री असतो तर बाहेत पडलो असतो, असं देखील आदित्य ठाकरे म्हणाले.
हे सरकार 2-3 महिन्यांमध्ये कोसळणार आहे कारण तुम्ही गद्दार आहात, असं भाकीत आदित्य ठाकरेंनी केलं आहे. मध्यावधी निवडणुका लागणार आहेत. हे गद्दार काय करत होते, यावर आम्ही नजर ठेवली नाही. कोणत्याही बाईला शिवी द्या, तसे संस्कार तुमच्या घरात असतील. या महाराष्ट्रात खरा मुख्यमंत्री कोण हेच कळत नाही,’ असा टोलाही आदित्य ठाकरेंनी लगावला.
महत्वाच्या बातम्या :
- Rohit Pawar | “…तर आम्ही सत्तारांचं विधान विसरून जाऊ”, अब्दुल सत्तारांच्या ‘त्या’ वक्तव्यावर रोहित पवारांचं मोठं विधान
- Aditya Thackeray | “… म्हणून हे सरकार पडणार”, आदित्य ठाकरेंनी सांगितलं सरकार पडण्याचा मुहर्त अन् कारण
- NCP | आरोप, राडा, या सर्वांनंतर घोडगंगा साखर कारखन्यावर पवारांचं राज्य
- Deepak Kesarkar | अब्दुल सत्तारांचा राजीनामा घेणार?; दीपक केसरकर म्हणाले,
- Jitendra Awhad । “तुम्ही शिव्यांच्या ज्या शाळेत आहात त्याचे आम्ही मुख्याध्यापक”; जितेंद्र आव्हाडांचा सत्तारांना टोला