मुंबई: राज्यात पावसाचा जोर वाढल्यामुळे अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. विदर्भात अनेक ठिकाणी संततधार पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आला असून वाहतूक ठप्प झाली आहे. अनेक धरणांचे दरवाजे उघडल्याने परिसरातील लोकांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे. प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात असताना युवसेनाप्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray यांनी युवा सैनिकांना आवाहन केले आहे.
युवासैनिकांनो! आताच्या राजकीय परिस्थितीकडे लक्ष न देता, जिथे जिथे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे अशा भागात शक्य असेल ती मदत पोहोचवा, मदत कार्य करा. सर्व सामान्य जनता अजूनही आपल्याकडेच आशेने पाहत आहे. जनतेचा विश्वास सार्थ ठरविण्याची “हीच ती वेळ”. असे ट्वीट करत आदित्य ठाकरे यांनी आवाहन करत शिंदे सरकारला चांगलाच टोलाही हाणला आहे.
युवासैनिकांनो!
आताच्या राजकीय परिस्थितीकडे लक्ष न देता, जिथे जिथे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे अशा भागात शक्य असेल ती मदत पोहोचवा, मदत कार्य करा… सर्व सामान्य जनता अजूनही आपल्याकडेच आशेने पाहत आहे… जनतेचा विश्वास सार्थ ठरविण्याची "हीच ती वेळ".— Aaditya Thackeray (@AUThackeray) July 16, 2022
दरम्यान पावसामुळे राज्यात निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीवर पूर्ण लक्ष असून सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क व समन्वय ठेवण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. आपत्कालीन परिस्थिती, बचाव व मदत कार्याबाबत सातत्यपूर्ण समन्वय ठेवण्याचे निर्देश मुख्य सचिवांना देण्यात आले आहेत. तसेच राज्यातील सर्व यंत्रणा सतर्क व सज्ज असून कुठलीही दुर्घटना घडू नये असे प्रयत्न आहेत. स्थलांतरितांना भोजनासह आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करण्यासह धरणांतून सोडण्यात येणारे पाणी आणि त्याबाबतच्या वेळांबाबत नागरिकांना माहिती देण्याबाबत सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या:
- Draupadi Murmu : “अवघ्या 15 मिनिटांपूर्वी मोदींनी फोन करून…”, द्रौपदी मुर्मू यांनी सांगितला ‘तो’ किस्सा
- Devendra Fadnavis : “ज्यांनी बांठिया आयोग नेमला, तेच आता…”, देवेंद्र फडणवीसांची विरोधकांवर टीका
- Sanjay Raut : “आमदार-खासदार फोडून सरकारे बनविली…”, संजय राऊतांचा केंद्रावर निशाणा
- Sanjay Raut : “हुकूमशहा हा एक डरपोक माणूस…”, असंसदीय शब्दांच्या यादीवरुन संजय राऊतांचा टोला
- Sanjay Raut : भाजपला ऐतिहासिक शब्दांचे भाले का टोचावेत?; ‘त्या’ नियमावरून शिवसेनेची टीका
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<