अदिती शिवपुण्यतिथी कार्यक्रमाच्या आयोजक नाहीत,सुनील तटकरे यांची सारवासारव

टीम महाराष्ट्र देशा- ‘जिल्हा परिषदेचे अध्यक्ष रायगड पूजा निधीचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. जिल्हा परिषदेकडून पूजा निधीला कार्यक्रमासाठी दरवर्षी निधी दिला जातो. जिल्हा परिषद अध्यक्ष या नात्याने अदिती तटकरे यांचं नाव या कार्यक्रम पत्रिकेत आहे. अदिती तटकरेंनी हा कार्यक्रम आयोजित केलेला नाही. यावरुन विपर्यास केला जातोय असं म्हणत सुनील तटकरे यांनी शिवपुण्यतिथीच्या कार्यक्रमाला सरसंघचालक मोहन भागवत यांच्या उपस्थिती लावण्याच्या मुद्द्यावरून सुरु असलेल्या वादातबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.

शिवपुण्यतिथीच्या कार्यक्रमाला सरसंघचालकांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आल्याने बरेच तर्क-वितर्क लावले जाऊ लागले होते. सोशल मिडीयावर मोठ्याप्रमाणावर सुनील तटकरे तसेच अदिती तटकरे यांच्यावर टीका होऊ लागली होती. या पार्श्वभूमीवर सुनील तटकरे यांनी ट्वीटरवरून हे स्प्ष्टीकरण दिलं आहे.

काय म्हणाले सुनील तटकरे
छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार पुण्यतिथी गेली १२३ वर्षे छत्रपती शिवाजी रायगड स्मारक मंडळाच्या वतीने साजरी केली जाते. या कार्यक्रमाला आजवर अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावलेली आहे.जिल्हा परिषद अध्यक्ष हे पूजा निधीचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. हा कार्यक्रम शिवाजी रायगड स्मारक मंडळाच्यावतीने आयोजित केलेला आहे. फक्त पूजा निधीचे पदसिद्ध अध्यक्ष असल्यामुळे अदिती तटकरे यांचे नाव निमंत्रक पत्रिकेवर नमूद केलेले आहे. आदिती तटकरे या कार्यक्रमाच्या आयोजक नाहीत. याबद्दल जाणिवपूर्वक जो अपप्रचार सुरु आहे तो विपर्यस्त आहे, असे मला वाटते.

You might also like
Comments
Loading...