Share

Adipurush | “आजच्या काळातील क्रूर” ; ‘आदिपुरुष’मधील रावणाच्या लुकवरून सुरू असलेल्या टीकांवर ओम राऊत यांची प्रतिक्रिया

मुंबई: नुकत्याच रिलीज झालेल्या आदिपुरुष चित्रपटाच्या टीजरची सर्वत्र चर्चा सुरू आहे. टीजर रिलीज नंतर सगळीकडे वातावरण तापलं आहे. कारण या चित्रपटातील सैफ अली खानचा रावणाचा लुक प्रेक्षकांना फारसा आवडलेला दिसत नाही. त्याचबरोबर चित्रपटातील VFX वर लोक सतत टीका करत आहे. रावणाच्या लुक मुळे प्रेक्षक चांगलेच संतप्त झाल्याचे दिसून येत आहे. या चित्रपटाच्या टीजरवर होणारी टीका ही वेदनादायक आहे असं चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊत यांनी स्पष्ट केलं होतं.

ओम राऊत यांची प्रतिक्रिया 

ओम राऊत यांनी या टीकांवर आपली प्रतिक्रिया मांडली आहे. ‘आज तक’सोबत बोलताना दिग्दर्शक ओम राऊत म्हणाले, “आदिपुरुष या चित्रपटातील रावण हा त्या काळातील नसून आजच्या काळातील दृष्ट आणि क्रूर रावण आहे. ज्याने छळकपटाद्वारे आमच्या माता सीतेचे अपहरण केले होते. आजच्या काळाला अनुसरून रावण जितका जास्त क्रूर दाखवता येईल तितका मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. हा चित्रपट आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे” असे ओम राऊत यांनी सांगितले. त्याचबरोबर ते म्हणाले, येणाऱ्या प्रत्येक टिकेचा आम्ही आदर करतो, शिवाय आम्ही त्याची नोंद घेऊन त्यावर कामही करू. जेव्हा 2023 मध्ये तुम्ही हा चित्रपट चित्रपटगृहात बघाल तेव्हा तुम्हाला कोणत्याही प्रकारची निराशा होणार नाही याची आम्ही खात्री घेऊ.

ओम राऊत यांच्या प्रतिक्रियेनंतर चित्रपटाचे संवाद लेखक मनोज मंतशीर यांनी देखील टीचर रिलीज वर आपली प्रतिक्रिया दिली. मनोज मंतशीर म्हणाले, “लोकांनी चित्रपटाची फक्त 1 मिनिट 35 सेकंदाची झलक पाहिली आहे. आणि त्यावर लोक आपली प्रतिक्रिया मांडत आहे. लोक म्हणत आहे, की हा रावण खिलजी सारखा दिसत आहे. पण त्या लोकांसाठी माझा एक प्रश्न आहे, की कोणता खिलजी कपाळावर टिळा लावतो, त्याचबरोबर अंगावर जानवं आणि गळ्यात रुद्राक्ष घालतो?”

काय आहे या चित्रपटामध्ये

आदिपुरुष हा चित्रपट रामायणापासून प्रेरित झालेला असून हा एक पौराणिक चित्रपट आहे. या चित्रपटामध्ये प्रभास प्रभू श्रीरामचंद्राची भूमिका म्हणजेच आदिपुरुषाची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटामध्ये देवदत्त नागे यांनी हनुमानाची भूमिका साकारली असून सनी सिंगने लक्ष्मणाची भूमिका पार पडली आहे. हा चित्रपट जानेवारी 2023 मध्ये प्रदर्शित होणार आहे.

महत्वाच्या बातम्या 

मुंबई: नुकत्याच रिलीज झालेल्या आदिपुरुष चित्रपटाच्या टीजरची सर्वत्र चर्चा सुरू आहे. टीजर रिलीज नंतर सगळीकडे वातावरण तापलं आहे. कारण या …

पुढे वाचा

Entertainment

Join WhatsApp

Join Now