‘हा देश मोदी आणि अमित शाह यांच्या बापाचा नाही’

टीम महाराष्ट्र देशा : भाजपाकडून माझा परिचय पाकिस्तानचे असल्याचे करून देण्यात येतो. मात्र मी त्यांना सांगू इच्छितो की, मी पाकिस्तानी आहे, असे वक्तव्य अधीर रंजन चौधरी केले आहे. पुढे ते असंही म्हणाले की “हा देश पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या बापाचा नाही”, अशा शब्दात अधीर रंजन चौधरी यांनी भाजपावर निशाना साधला.

काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी हे आपल्या वक्तव्यांनी कायम वादात सापडतात. देशात नागरिकत्व दुरुस्ती कायदा लागू झाला असला तरी काँग्रेसकडून अजूनही या कायद्याला विरोध केला जात आहे. या कायद्याला विरोध करत असताना पश्चिम बंगालचे काँग्रेस नेता खासदार अधीर रंजन चौधरी यांची जीभ घसरली.

Loading...

मोदी सरकारवर निशाना साधत ते म्हणाले की, “भाजपचे नेते काँग्रेस नेत्यांना म्हणजे आम्हाला पाकिस्तानी म्हणून हिणवतात. मात्र, मी आता त्यांना सांगू इच्छितो की, हो आहे मी पाकिस्तानी! तुम्हाला जे करायचं आहे ते करा. आज देशात कुणीच खरं बोलू शकत नाही. कारण जे खरं बोलतात त्यांना देशद्रोही ठरवलं जातं.”

दरम्यान, यावेळी अधीर रंजन चौधरी यांनी नरेंद मोदी आणि अमित शाह यांच्यावर टीका केली आहे. NRC बद्दल कुठलीच चर्चा होत नाही असे मोदी म्हणाले. पण यांच्या बोलण्याला कोणी बळी पडू नका. कारण मोदी आणि शहा हि रामू आणि शामू ची जोडी आहे. ते दोघही लोकांची दिशाभूल करण्यात मास्टर आहेत. असही अधीर रंजन चौधरी यावेळी म्हणाले.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

अजय देवगणजी खूप कमवल आता तान्हाजी मालुसरेंच्या वंशजांना आर्थिक मदत करा - मनसे
हे सरकार पडले तर 'आम्हाला' दोष देऊ नका...
आम्ही रात्रीच्या वेळी झोपूही शकत नाही ; आम्हाला येथे अजिबात सुरक्षित वाटत नाही
व्याह्याला वाचवण्यासाठी संजय काकडेंची धडपड
'अजित पवारांना पुन्हा आमच्याबरोबर यायचं दिसतंय'
...त्यामुळे पहिल्यांदाच मला सभागृहात बसावं असं वाटल - उद्धव ठाकरे
अभिमान आहे सर तुमचा : संपूर्ण शहरात दहशत असणाऱ्या गुंडाच्या अनधिकृत बंगल्यावर मुंढेंचा हातोडा
कीर्तने पोलीस बंदोबस्तात करावी लागतात हीच तर माझी दहशत - तृप्ती देसाई
'स्व. बाळासाहेब होते का स्वतंत्र लढ्यात', निलेश राणेंचा शिवसेनेवर पलटवार
छगन भुजबळांच्या विरोधात गेला तो 'संपला' ! वाचा काय आहे प्रकरण