चना खरेदीसाठी अतिरिक्त गोदाम, बारदाना आणि ग्रेडरची तातडीने व्यवस्था करावी- खा.मुंडे

Pritam Munde

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) : जिल्ह्यात अद्याप मोठ्या प्रमाणावर चना शिल्लक आहे. शेतकर्‍यांचा सर्व चना खरेदी करण्याची सरकारची जबाबदारी आहे. त्यासाठी अतिरिक्त गोदाम, बारदाना आणि ग्रेडरची आवश्यकता असुन त्याची तातडीने व्यवस्था करावी असे खा. डॉ. प्रितम मुंडे यांनी पणन व सहकारच्या प्रधान सचिवांना लिहिले आहे. पत्राची दखल घेऊन याबाबत सकारात्मक कारवाई करण्याच्या सूचना प्रधान सचिव अनुपकुमार यांनी जनरल मॅनेजर यांना दिल्या आहेत.

बाळासाहेब थोरातांनी थेट शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन जाणून घेतल्या व्यथा

यावर्षी बीड जिल्ह्य़ात चना (हरबरा) पीकाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन झाले आहे. जिल्ह्य़ात आणखी जवळपास दीड लाख क्विंटल चना शिल्लक असल्याचा अंदाज आहे. त्यातही धारूर व अंबाजोगाई भागात चना भरपूर असून, खरेदीची अट प्रति शेतकरी फक्त 25 क्विंटल आहे ती वाढवून द्यावी ज्यामुळे शेतकर्‍यांचे नुकसान होणार नाही. जिल्ह्यामध्ये हरभराचे पीक मुबलक प्रमाणात आहे परंतु लॉकडाऊनमुळे ते शेतकऱ्यांना विक्री करता न आल्याने लोकांच्या घरातच पडून आहे. खरेदीसाठी ग्रेडरच्या नियुक्ती लवकर करण्यात आलेल्या नाहीत तर कर्मचारी वर्ग अपुरा आहे, जे एजंट नेमले आहेत त्यांची खरेदी क्षमता कमी आहे त्यामुळे चना खरेदीची गती मंदावलेली असल्याचे खा. मुंडे यांनी पत्रात नमूद केले आहे.

संतापजनक : शिवराज्याभिषेक दिनासंबंधी भाजप नेत्याचे आक्षेपार्ह ट्वीट, आपची पोलिसांत तक्रार

धारुर व अंबाजोगाई भागात चना मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. परंतु तो ठेवण्यासाठी अतिरिक्त गोडाऊन, बारदाना, ग्रेडर वाढवावे लागतील. तसे केले नाही तर शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान होणार आहे. तसेच प्रति शेतकरी 25 क्विंटल चना घ्यावा असा नियम केलेला आहे. परंतु या भागात आवक जास्त असल्याने तो नियम शिथील करून प्रति शेतकरी खरेदीची क्षमता वाढवावी अशी मागणी पणन मंत्री ना. बाळासाहेब पाटील यांच्याकडे केलेली आहे.