व्यसनाधीन शिक्षकांना लागणार लगाम!

व्यसनाधीन शिक्षक

टीम महाराष्ट्र देशा: विद्यार्थ्यांसमोर तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणाऱ्या शिक्षकांना शाळेच्या परिसरात बंदी घालण्याचे आदेश प्राथमिक शिक्षण संचालनालयाने जारी केले आहे. विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीचे धडे गिरवणारे अनेक शिक्षक गुटखा, तंबाखूच व्यसन करतात. मात्र यापुढे शाळेत व्यसन करणाऱ्या शिक्षकांना आता घरीच बसावे लागणार आहे.

प्राथमिक शिक्षण संचालनालयाने महत्वाचा आदेश जारी केला आहे. ग्रामीण भागात अनेक शिक्षक व्यसन करून विद्यार्थांना शिकवितात. त्यामुळे विद्यार्थांवर चुकीचे संस्कार होतात. शिक्षकांच्या व्यसनाधीनते विरोधात ओरियंटल ह्युमन राईटस् प्रोटेक्शन फोरमने शिक्षण विभागाकडे तक्रार केली होती. शिक्षण सहसंचालकांनी या तक्रारची दखल घेतली असून विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकाऱ्यांना व्यसनी शिक्षकांवर कारवाईच्या सूचना दिल्या आहेत.