संघाच्या कार्यकर्त्यांनाच हाफ पॅन्ट घालून सीमेवर पाठवा- शरद पवार

sharad pawar vr mohan bhagavat

पंढरपूर : भारतीय लष्कराला सैन्य उभारणीसाठी अनेक महिने लागतात. मात्र, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ वेळ पडल्यास अवघ्या तीन दिवसांमध्ये स्वत:चे लष्कर उभे करू शकते, असे वक्तव्य सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं होत. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष यांनी सैन्य दल हे राजकारणापासून, टिंगल टवाळी पासून दूर ठेवण्याची गरज आहे. असे स्पष्ट केले.

काय म्हणाले शरद पवार?

देशातील सैन्याने देशाचे संरक्षण करण्यासाठी मोठी किंमत दिलेली आहे. आज काश्मीर मध्ये दररोज आपले सैनिक हुतात्मा होत आहेत. परंतु तरीही आपले सैनिक प्राणपणाने देशाचे रक्षण करण्याचे काम करत आहेत. केंद्र सरकारने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनाच आतंकवाद्यांशी सामना करण्यासाठी हाफ पॅन्ट घालून सीमेवर देशाच्या संरक्षणासाठी हातात काठी घेऊन पाठवावे. म्हणजे सरसंघचालक मोहन भागवतांच्या म्हणण्यात किती तथ्य आहे हे देशाला कळेल. या मध्ये आम्हाला राजकारण करायचे नाही. परंतु, सैन्य दल हे राजकारणापासून, टिंगल टवाळी पासून दूर ठेवण्याची गरज आहे. भागवतांचे वक्तव्य भारतीय सैन्याची अप्रतिष्ठा करणारे आहे.

2 Comments

Click here to post a comment
Loading...