संडे असो वा मंडे, रोज खा अंडे

टीम महाराष्ट्र देशा – संडे असो वा मंडे, रोख खा अंडे! अशी जाहिरात केली जात आहे. मात्र, आपण किती अंडी खातो याचा विचार केला पाहिजे. अंडे शरीरासाठी अधिक ऊर्जा देणारा घटक आहे. तुम्हाला तंदुरुस्त राहण्यासाठी वर्षभरात किमात १८० अंडी खाण्याची आवश्यकता आहे. म्हणजेत महिन्यात १५ अंडी पोटात जाणे आवश्यक आहे.

 अंड्यातून नेमकं काय मिळते?

– दिवसातून एका अंडय़ाचे सेवन केल्याने हृदयरोगाचे प्रमाण कमी होत असल्याचे अभ्यासात आढळून आले आहे.

– अंड्याच्या बलकापासून व्हिटॅमिन्स, क्षार, लोह मिळते.

– अंड्यांचे सेवन केल्याने वजन कमी करणाऱ्यांना फायदा होतो.

– अंड्याच्या बलकातील ‘कोलीन’ हा घटक बौद्धिक विकासात उपयुक्त ठरतो

– अंड्यातील बलक डोळे निरोगी राखण्याबरोबरच स्नायूंची झीज रोखण्यासाठीही उपयुक्त

– अंड्यांमधून ऊर्जा, प्रथिने, काबरेहायड्रेट, कोलीन, व्हिटॅमिन ए,डी,बी-६, बी-१२,

– अंड्यातून फॉस्फेट, आयर्न, कॅल्शियम, सोडियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम पोषणमूल्ये मिळतात.

– रोज अंडय़ांचे सेवन केल्यामुळे मेंदूत रक्तस्रावाचे प्रमाण २६ टक्क्यांनी कमी होत असून यामूळे मृत्यू होण्याच्या संभावनेत २८ टक्क्यांनी घट होते.

– अंडी खाल्याने रक्तातील कोलेस्टरॉलचे प्रमाण कमी राहाते.

You might also like
Comments
Loading...