आदर्श घोटाळा : अशोक चव्हाणांना उच्च न्यायालयाकडून दिलासा

ashok chawan on adarsh scam

मुंबई : आदर्श घोटाळ्याप्रकरणी माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. आदर्श घोटाळ्याप्रकरणी राज्यपालांनी अशोक चव्हाण यांच्या चौकशीचे आदेश दिले होते. हे आदेश बेकायदेशीर ठरवत उच्च न्यायालयाने ते रद्द केले आहेत.

अशोक चव्हाण यांच्याविरोधात खटला चालवण्यास राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी परवानगी दिली होती, याला चव्हाण यांनी मुंबई उच्च न्याय़ालयात आव्हान दिले होते. चव्हाणांच्या वतीने ज्येष्ठ कायदेतज्ञ अॅड. अमित देसाई यांनी युक्तीवाद केला होता.

आदर्श प्रकरणात आपल्याविरोधात खटला चालवण्याची परवानगी म्हणजे लोकशाहीचा खून असल्याचा युक्तीवाद चव्हाण यांच्यावतीने उच्च न्यायालयात करण्यात आला होता. 2014 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत मी निवडून आल्यामुळे मला लक्ष्य केले जात असल्याचा आरोपही चव्हाण यांनी केला आहे.