अखेर अदर पुनावाला पुण्यात परतले; ‘वाय’ दर्जाची खास सुरक्षा तैनात

adar poonawala

पुणे : सीरम इस्टिट्यूटचे सीईओ अदर पुनावाला यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत धक्कादायक खुलासा केला होता. त्यांनी म्हटलं होतं की, मला धमक्या दिल्या जातायत आणि सत्य बोललो तर माझे शीर कापले जाईल, अशीही भीती त्यांनी व्यक्त केली आहे. आपल्या देशातील श्रीमंत आणि मोठ्या मोठ्या राजकीय हस्थींकडून त्यांना या धमक्या येत आहेत, त्यांच्या या दाव्यानंतर देशभरात एकच खळबळ उडाली होती. या धमक्यांमुळेच अदर पुनावाला हा देश सोडून लंडन ला गेले होते.

आता अदर पुनावाला मायदेशी परतले असून त्यांच्यासाठी खास सुरक्षा देखील तैनात करण्यात आली आहे. पुनावाला हे आज पुण्यात दाखल झाले आहेत. तर त्यांना वाय दर्जाची खास सुरक्षा पुरवण्यात आली आहे. त्यांनी स्वतःच्या सुरक्षेवरून आणि धमक्यांबाबत भाष्य केल्यानंतर देशासह राज्यात राजकारण रंगलं होतं. तर, पुनावाला यांनी केलेल्या धक्कादायक खुलास्यावरून उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली होती.

काय म्हणाले होते उच्च न्यायालय ?

पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटच्या अदर पुनावाला यांनी देशासाठी सध्याचा काळात खूप भरीव योगदान दिलंय. संपूर्ण देशासह जगासाठी एक संजीवनी ठरणारी ‘कोविशिल्ड’ ही लस त्यांच्या कंपनीनं तयार केली. त्यामुळे अशा व्यक्तीला जर धमक्या येत असतील तर ते फार गंभीर प्रकरण आहे. याची तातडीनं दखल घ्यायला हवी, असं मत मुंबई उच्च न्यायालयाने व्यक्त केलं होतं.

महत्वाच्या बातम्या