‘सर्वात पहिले आणि सर्वात मोठ्या प्रमाणावर लस तयार करणार’, आदर पूनावालांचा मोठा दावा

poonawalla-new

पुणे : दक्षिण ध्रुवापासून उत्तर ध्रुवापर्यंत, वडगाव बुद्रुक पासून वॉशिंगटन पर्यंत सगळे जण एकच प्रश्न विचारात आहेत की कोरोनावर लस कधी येणार. आता याच कोरोनावर लस तयार करण्याचं काम ऑक्सफर्ड विद्यापीठात सुरु आहे. या लशीची पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणीचे निष्कर्ष सकारात्मक आहेत. ही लस यशस्वी झाली तर जगाला मोठा दिलासा मिळणार आहे. भारतात या लशीचं उत्पादन पुण्याच्या सीरम इन्स्टिट्युटमध्ये केलं जाणार आहे. सीरम इन्स्टिट्युटकडून लस बनवण्याचे काम वेगाने सुरू आहे.

अशातच पुण्यातील सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदार पूनावाला यांनी सर्वात पहिले आणि सर्वात मोठ्या प्रमाणावर लस तयार करणार असल्याचा दावा केला आहे. अदार पूनावाला म्हणाले, ‘असे फार कमी लोक आहेत, जे एवढ्या कमी कालावधीत आणि एवढ्या कमी किमतीत कोरोना लसीचे एवढ्या मोठ्या प्रमाणावर उत्पादन करू शकतात. कोरोना लसीच्या पहिल्या खेपेसाठी मला देश-विदेशातून अनेक नेत्यांचे फोन येत आहेत. मला त्यांना समजून सांगावे लागत आहे, की मी तुम्हाला अशीच लस देऊ शकत नाही.’

‘त्यांना दुध आणि लोण्यातील फरक तरी कळतो का’ ? ओमराजेंचा राणा पाटलांना जोरदार टोला

ऑक्सफर्डच्या वैज्ञानिकांसोबत कोरोना लस तयार करण्याच्या कामात लागलेल्या सीरम इंस्टिट्यूटने एप्रिल महिन्यातच उघडपणे लस तयार करण्याचा दावा केला होता. आता कंपनीत प्रति मिनिट 500 डोस तयार होत आहेत. मात्र ही लस किती मोठ्या प्रमाणावर तयार होणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. एवढी मोठी लोकसंख्या असलेल्या देशात मोठ्या प्रमाणावर लसीची आवश्यकता भासणार आहे. अशात पूनावाला भारत आणि इतर देश यांच्यात 50-50 पद्धतीनेही विभागणी करू शकतात.

तर ‘परवानगी मिळताच आम्ही लसीचे परीक्षण सुरू करू. याच बरोबर आम्ही मोठ्या प्रमाणावर लसीचे उत्पानही सुरू करू. अस अदार पूनावाला म्हणाले आहेत. ‘ याच महिन्या पुनावाला म्हणाले होते, की याच वर्षाच्या अखेरपर्यंत आम्ही लस तयार करू अशी आशा आहे. एवढेच नाही, तर घाई करण्याऐवजी गुणवत्तापूर्ण आणि सुरक्षित लस तयार करणे, हा कंपनीचा उद्देश आहे.

मेहबुबा मुफ्ती यांची सुटका करा : राहुल गांधी

IMP