आदर पूनावालांची मोठी घोषणा, बूस्टर डोसची ही असेल किंमत

नवी दिल्ली : कोरोना लसीकरण सुरु झाल्यानंतर केंद्र सरकार तर्फे पहिला व दुसरा कोरोनाचा पहिला व दुसरा डोस लोकांना मोफत दिला गेला होता. काही खाजगी दवाखान्यात शुल्क आकारून ही डोस घेण्याची व्यवस्था सरकारने नागरिकांना दिली होती. पण आता तिसऱ्या डोससाठी म्हणजेच बूस्टर डोस साठी नागरिकांना पैसे मोजावे लागणार आहे.

कोव्हिशिल्डचा बूस्टर डोस 600 रुपयांना मिळेल, अशी घोषणा सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी केली होती. आता आदर पूनावाला यांनी एक नवी घोषणा केली आहे. बूस्टर डोसची किंमत जाहीर केली आहे. पूनावाला यांनी म्हटले आहे की, “केंद्र सरकारशी चर्चा केल्यानंतर सिरमने कोव्हिशिल्ड लशीची किंमत कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. खासगी रुग्णालयांना कोव्हिशिल्ड 600 रुपयांना देण्यात येणार होती. आता तिची किंमत प्रतिडोस 225 रुपये करण्यात आली आहे. केंद्र सरकारने 18 वर्षांवरील सर्वांना प्रतिबंधात्मक डोस घेण्याची सूचना केली आहे. या निर्णयाचेही आम्ही स्वागत करतो.”

यामुळे आता तिसऱ्या डोससाठी नागरिकांना पैसे मोजावे लागणार आहेत.महत्वाच्या बातम्या

महत्त्वाच्या बातम्या :

“झुंडीना भिणारा नाही, शूर सह्यांद्रीचा सिंह…”, जितेंद्र आव्हाडांनी लिहिली शरद पवारांवर कविता
IPL 2022 : चालू सामन्यात फलंदाजानं घेतला टॉयलेट ‘ब्रेक’ अन्….! गुजरात-पंजाब मॅचमध्ये घडला ‘असा’ प्रकार; पाहा VIDEO
“एसटी कामगार आंदोलन भरकटलं गेलं”; गोपीचंद पडळकर
“राजकीय संस्कृतीला काळिमा फासणारी ही घटना”- रुपाली चाकणकर
IPL 2022 ठरतंय कंटाळवाणं..? सामने सुरू असताना BCCIला बसला ‘मोठा’ धक्का!