मुंबईतील मुख्यालय अहमदाबादला नेण्याबाबत अदानींचा खुलासा, म्हणाले..

मुंबई : मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ पूर्णपणे अदानी समूहाच्या ताब्यात गेले आहे. विमानतळाच्या व्यवस्थापनाचे पूर्ण नियंत्रण अदानी एअरपोर्ट होल्डिंग लिमिटेडकडे (एएएचएल) देण्याचा निर्णय मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेडच्या (मिआल) संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

त्यानंतर आता मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचा ताबा घेताच अदानींनी आता कंपनीचे मुख्यालय गुजरातमधील अहमदाबादला हलवले आहे. त्यामुळे विमानतळ महाराष्ट्रातील मुंबईत तर त्याचे मुख्यालय हे गुजरातमधील अहमदाबादमध्ये असे काहीसं चित्र निर्माण झाले आहे.

या निर्णयावर शिवसेनेसह अनेकांनी टीका केली आहे. या प्रकाराचा निषेध करत मुंबई विमानतळाचे मुख्यालय हे मुंबईतच राहील यासाठी शिवसेना आक्रमक राहील, असा इशारा दिला आहे. दरम्यान, मुख्यालय अहमदाबादला का हलवले याबाबत अदानी समुहाने स्पष्टीकरण दिले आहे.

‘अदानी ग्रुप एअरपोर्ट सेक्टरमध्ये गतीने पुढे जात आहे. अशात अदानी एअरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेडने आपलं मुख्य कार्यालय मुंबईतून गुजरातमध्ये हलवण्याचा निर्णय घेतला आहे’ असं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे.

कंपनीच्या कामकाजात सुसूत्रता यावी, ते सुलभ व्हावं यासाठी कंपनीचे मुख्यालय हे मुंबईतून अहमदाबादला शिफ्ट करण्यात येत असल्याची प्रतिक्रिया अदानी कंपनीकडून देण्यात आली आहे. मात्र यामागचे खरं कारण हे अद्याप गुलदस्त्यात आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IMP